(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नजर हटी दुर्घटना घटी! रेल्वे स्टेशनवरील LED वर 3 मिनिटं चालली पॉर्न फिल्म, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
Bihar Patna News : आपण घरामध्ये टिव्ही पाहत असू आणि अचानक किसिंग सीन सुरु झाला तर आपण लगेच चॅनेल बदलतो. पण विचार करा सार्वजनिक ठिकाणी पॉर्न फिल्म लागली तर काय होईल?
Bihar Patna News : आपण घरामध्ये टिव्ही पाहत असू आणि अचानक किसिंग सीन सुरु झाला तर आपण लगेच चॅनेल बदलतो. पण विचार करा सार्वजनिक ठिकाणी पॉर्न फिल्म लागली तर काय होईल? विचारही करु शकत नाही ना...? पण बिहार स्टेशनवरील एलईडीवर चक्क पॉर्न फिल्म लागली.. स्टेशनवर तुफान गर्दी होती, प्रवासी ट्रेनची वाट पाहत होते अन् त्याचवेळी एलईडीवर पॉर्न फिल्म लागली. सगळीकडे एकच गोंधळ उडाला, नेमकं काय झाले कुणालाच समजत नव्हते.. तीन मिनिटे एलईडीवर पॉर्न फिल्म सुरु होती. रेल्वे कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच पॉर्न फिल्म बंद करण्यात आली. त्यासोबतच संबंधित अधिकाऱ्याची चौकशी सुरु करण्यात आली. या सर्व प्रकरणानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे पोलीस याचा तपास करत आहेत.
रेल्वे स्टेशनवरील एलईडीवर कशी चालली अश्लिल फिल्म ?
मिळालेल्या माहितीनुसार, पटना स्टेशनवरील ज्या एलईडीवर अश्लिल व्हिडीओ चालला, त्यावर जाहिरातीसंदर्भातील व्हिडीओ चालणार होता. दत्ता कम्युनिकेशन एजन्सीला या टिव्हीवरील स्क्रीनवर सूचना देणे आणि व्हिडीओ चालवण्याची जबाबदारी होती. त्या एजन्सीला टिव्हीवर जाहिरातीचा व्हिडीओ प्ले करायचा होता. पण त्यावेळी एजन्सीचे कर्मचारी पॉर्न क्लिप पाहत होते. गडबडीत त्यांनी अश्लील क्लिप टिव्हीवरील स्क्रीनवर प्ले झाली. पटना रेल्वे स्टेशनच्या एलईडीवर पॉर्न फिल्म सुरु झाल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकीत झाले. नेमकं काय होतेय? हे कुणाच्याही लक्षात आले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी तात्काळ कारवाई केली.
एजन्सीविरोधात कारवाई
रेल्वे स्टेशनवरील एलईडीवर पॉर्न फिल्म लागल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ आरपीएफ आणि जीआरपी यांच्या मदतीने व्हिडीओ बंद केला. दत्ता कम्युनिकेशन एजन्सीला फोन करत याबाबतची माहिती घेतली. त्यानंतर RPF ने दानापुर रेल्वे डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यासोबत दत्ता कम्युनिकेशन एजन्सीविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दत्ता कम्युनिकेशन एजन्सीच्या ऑफरेटर आणि संबधित कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ, तपास सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, पटना स्टेशनवरील प्लेटफॉर्म 10 च्या टिव्ही सेटवर पॉर्न फिल्म सुरु झाली होती. हा प्रकार निष्काळजीपणाचा आहे. कारण रेल्वे स्थानकावर गर्दी असते... हे सार्वजनिक ठिकाण आहे, येथे सर्व वयोगटातील लोक, वृद्ध, लहान मुले, महिला असतात. त्यामुळेच अशा ठिकाणी घडलेला हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. तीन मिनिटे सार्वजनिक ठिकाणी पॉर्न फिल्म चालली, यामुळे स्टेशनवरील प्रवासी तर गोंधळलेले होतेच, त्याशिवाय अधिकाऱ्यांनाही सुरुवातीला नेमकं काय झाले ते समजले नव्हते. या प्रकरणाबाबत दत्ता कम्युनिकेशन या एजन्सीच्या संबधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु झाला आहे.