एक्स्प्लोर
विजय मल्ल्यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, प्रत्यार्पणाला मंजुरी
मुंबई : सरकारी बँकांचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाला ब्रिटिश सरकारनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे विजय मल्ल्या यांना भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारी बँकांचं सुमारे ९ हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवून परदेशात पलायन करणारा उद्योगपती विजय मल्ल्याचं प्रत्यार्पण करण्याची भारतानं ब्रिटन सरकारला केली होती. फेब्रुवारीत केलेली ही विनंती ब्रिटन सरकारने मान्य केली आहे. ब्रिटन सरकारच्या मंजुरीनंतर याबाबतचा प्रस्ताव वेस्टमिनिस्टर कोर्टापुढे ठेवण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत शुक्रवारी माहिती देण्यात आली. ब्रिटनचं वेस्टमिनिस्टर जिल्हा कोर्ट आता मल्ल्याच्या नावाने वॉरंट काढेल अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी दिली आहे.
विजय मल्ल्या फरार घोषित
देशभरातील प्रमुख बँकांना जवळपास 9 हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला अखेर फरार घोषित करण्यात आलं होतं. ईडीच्या मागणीनंतर विशेष न्यायालयानं विजय हा निर्णय दिला.
कर्ज बुडवेगिरी करत विजय मल्ल्यांचं ब्रिटनमध्ये पलायन
विजय मल्ल्या यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि इतर सहकारी बॅंकांचे जवळपास 9000 कोटी रुपये बुडवत 2016 साली ब्रिटनमध्ये पळ काढला होता.
आयडीबीआयचेही 720 कोटी रुपये बुडवल्याप्रकरणीदेखील विजय मल्ल्या यांच्या विरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आले होतं.
काय आहे प्रकरण?
किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे.
मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने 1411 कोटींची संपत्ती जप्त केली होती.
काही महिन्यांपूर्वी ईडीने विजय मल्ल्याची 1411 कोटींची मालमत्ता आयडीबीआय बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी जप्त केली होती. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये मल्ल्याच्या बँक खात्यातील 34 कोटी रुपये, बंगळुरु आणि मुंबईतील प्रत्येकी एक फ्लॅट, चेन्नईमधील 4.5 एकरचा औद्योगिक भागातील प्लॉट, 27.75 एकर कॉफीची बाग, यूबी सिटीमधील निवासी घर, तसेच बंगळरुमधील किंगफिशर टॉवरचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
विजय मल्ल्याची 6630 कोटींची संपत्ती जप्त, अजामीनपात्र वॉरंटही जारी
कर्ज बुडवल्याप्रकरणी विजय मल्ल्या अखेर फरार घोषित
विजय मल्ल्या कर्ज प्रकरण : सीबीआयचं अटकसत्र, बडे मासे जाळ्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement