एक्स्प्लोर

Vantara on Madhuri Elephant : माधुरी पुन्हा कोल्हापुरात येणार! वनताराने सांगितलं पुढचं प्लॅनिंग; म्हणाले, आरोग्याची आणि देखभालीची जबाबदारी आमची...

Vantara on Madhuri Elephant Return to Kolhapur : 36 वर्षीय माधुरी हत्तीच्या कोल्हापुरात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Vantara on Madhuri Elephant Return to Kolhapur : 36 वर्षीय माधुरी हत्तीच्या कोल्हापुरात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महादेवी या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या माधुरीच्या कोल्हापुरातील पुनरागमनानंतरही तिच्या आरोग्याची आणि देखभालीची सातत्याने काळजी घेतली जाईल, असा विश्वास वनताराने व्यक्त केला आहे.

अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर माधुरीला जामनगरला हलवण्यात आलं

वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै 2025 रोजी माधुरीला जामनगरमधील राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टमध्ये नेण्यात आलं होतं. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवलं होतं. माधुरीची कस्टडी मागितली नव्हती, मात्र सक्षम अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तिची जबाबदारी स्वीकारून तिची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले होते, असं वनताराने स्पष्ट केलं. महाराष्ट्रात, विशेषतः कोल्हापुरात माधुरीच्या प्रकरणाने मोठं लक्ष वेधून घेतलं होतं. ती अनेक दशकांपासून नांदणी मठात राहत होती. तिच्या आरोग्याबरोबरच राहण्याच्या परिस्थितीवरही प्रश्न उपस्थित झाले होते. पशुकल्याण अधिकाऱ्यांकडून झालेली कारवाई आणि PETA India शी संबंधित कायदेशीर प्रक्रियेनंतर माधुरीला जामनगरला हलवण्यात आलं होतं.

HPC ने कोल्हापुरात परतण्यास दिली मंजुरी

यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व संबंधित पक्षांना HPC समोर आपापली बाजू मांडण्याचे निर्देश दिले. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर, अहवालांचा आढावा घेत आणि नांदणी मठातील सुविधेची पाहणी केल्यानंतर HPC ने 9 सप्टेंबर 2026 रोजी माधुरीला कोल्हापुरात परतण्याची परवानगी दिली. मात्र, माधुरीच्या सुरक्षेसाठी समितीने काही महत्त्वाच्या अटीही घातल्या आहेत. माधुरीचा मिरवणूक किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी वापर करता येणार नाही. तसेच तिची नियमित देखभाल करण्यासोबतच दर दोन आठवड्यांनी तिची वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे. HPC चा हा निर्णय वंतारा स्वीकारत असून, माधुरीच्या पुनरागमनाशी संबंधित सर्व अटींचं पालन केलं जाईल, असं संघटनेने म्हटलं आहे.

माधुरीच्या जुन्या आजारांवर अद्याप लक्ष आवश्यक

वनताराने हेही स्पष्ट केलं की माधुरीच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी तिच्या दीर्घकाळापासून असलेल्या आरोग्याच्या समस्या पूर्णपणे दूर झाल्या आहेत, असं मानता येणार नाही. जामनगरमध्ये उपचारादरम्यान तिच्या अनेक जुन्या आरोग्य समस्या नियंत्रणात आणण्यात आल्या. मात्र, यापुढेही माधुरीला सातत्याने पशुवैद्यकीय देखरेख आणि आवश्यक उपचारांची गरज राहणार आहे.

माधुरी जामनगरमध्ये राहणार नसली तरी तिच्या आरोग्याची जबाबदारी वनतारा सोडणार नाही. माधुरीच्या कोल्हापूर वापसीपूर्वी नांदणी मठात योग्य निवारा, पशुवैद्यकीय सुविधा, वैद्यकीय उपकरणं, औषधं आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यासाठी वनताराने मदत केली आहे. HPC च्या निर्देशांनुसार वनताराचे पशुवैद्यकीय तज्ज्ञ दर दोन आठवड्यांनी कोल्हापुरात जाऊन माधुरीची तपासणी करतील. या तपासणीचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. उपचारात सातत्य राहावं आणि माधुरीच्या आरोग्यावर नियमित लक्ष ठेवता यावं, हा या व्यवस्थेमागचा उद्देश असल्याचं वनताराने सांगितलं.

माधुरीच्या परतीपूर्वी नांदणी मठात सुविधांमध्ये सुधारणा

माधुरीच्या कोल्हापूर वापसीपूर्वी वनताराने नांदणी मठात काही कामं केली आहेत. सध्या शक्य तितक्या सुविधा सुधारण्यात आल्या आहेत. मात्र, टाउन प्लॅनिंगशी संबंधित काही मर्यादांमुळे पुढील बांधकामावर निर्बंध आहेत. ट्रस्टच्या जमिनीतून जाणाऱ्या रस्त्यामुळे विकासासाठी उपलब्ध जागाही मर्यादित असल्याचं वनताराने सांगितलं. माधुरी नवीन वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतरही सुविधा आणखी सुधारण्यासाठी मदत सुरू ठेवण्याची तयारी वनताराने दर्शवली आहे. न्यायालय किंवा सक्षम प्राधिकरणाकडून निर्देश मिळाल्यास अपग्रेडच्या कामातही सहकार्य केलं जाईल, असं संघटनेने स्पष्ट केलं.

'माधुरीबाबतची आमची बांधिलकी कायम राहणार...'

माधुरी जिथे राहते त्यापेक्षा तिचं आरोग्य, पशुवैद्यकीय उपचार आणि कल्याण यांना वनताराकडून अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं संघटनेने म्हटलं आहे. वास्तविक पशुकल्याणासाठी तथ्यांवर आधारित निर्णय, पशुवैद्यकीय विज्ञान, जबाबदार देखभाल, कायदेशीर प्रक्रियेचा आदर आणि प्राण्यांच्या जीवनाच्या सुरक्षेबाबत कायमची बांधिलकी आवश्यक असल्याचं वनताराने स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि HPC च्या निर्देशांबद्दल वंताराने आभार मानले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात सरकार, संबंधित अधिकारी, जैन मठ आणि कोल्हापुरातील नागरिकांचेही संघटनेने आभार मानले.

"माधुरीचं आरोग्य आणि कल्याण ही वंताराची पहिली प्राथमिकता आहे. ती कुठे राहते यावर तिच्या आरोग्य, कल्याण आणि सन्मानाप्रती आमची बांधिलकी अवलंबून नाही. तिचं उत्तम आरोग्य राहावं आणि तिला दीर्घ, सुरक्षित आणि आनंदी आयुष्य लाभावं, हीच आमची इच्छा आहे," असं वनताराने म्हटलं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget