एक्स्प्लोर

बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांचा बळी, गावकऱ्यांनी जंगलच पेटवलं

या बिबट्याला वनविभागाने नरभक्षक घोषित केलं असून त्याला ठार मारण्यासाठी आदेशही देण्यात आले आहेत.

देहराडून : गावातील लहान मुलावर बिबट्याने हल्ला केल्याच्या कारणातून ग्रामस्थांनी जंगलंच पेटवून दिलं आहे. उत्तराखंडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर गावातील एका 8 वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला, ज्यात चिमुकल्याला आपला जीव गमावावा लागला. चिडलेल्या ग्रामस्थांनी बिबट्याला संपवण्यासाठी गावाशेजारील जंगलच पेटवलं. सोमवारी संध्याकाळी नैसर्गिक विधी करण्यासाठी हा मुलगा घराशेजारी गेला होता. चिमुकल्याची आई स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. याचवेळी बिबट्याने लहानग्यावर हल्ला केला आणि त्याला जंगलात ओढून नेलं. गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्य़ंत मुलाचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी  सकाळी त्याचं अर्थं खाल्लेलं शरीर सापडलं. चिडलेल्या 4 ते 5 हजार ग्रामस्थांनी आठ एकरावरील जंगलालाच पेटवलं. आग विझवण्यासाठी कुणाला प्रयत्न करताही आले नाहीत कारण ग्रामस्थांनी बाहेरच्यांना गावात प्रवेश करण्यास मज्जाव केला. याच बिबट्याने मार्च महिन्यात चार वर्षांच्या चिमुकल्याचा जीव घेतल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला. तीन महिन्यातील सलग दुसरी घटना असल्यामुळे ग्रामस्थांनी जंगलालाच आग लावली. दरम्यान या बिबट्याला वनविभागाने नरभक्षक घोषित केलं असून त्याला ठार मारण्यासाठी आदेशही देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
India Song In Pakistan : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय देशभक्तीचे बॉलिवूड गाणे, 'केसरी'मधील गाण्यावर शाळेत सैनिकाच्या वेशात डान्स
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय देशभक्तीचे बॉलिवूड गाणे, 'केसरी'मधील गाण्यावर शाळेत सैनिकाच्या वेशात डान्स
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Embed widget