एक्स्प्लोर

Uttrakhand : उत्तराखंडमध्ये टनेलचा भाग कोसळला, 36 मजूर अडकले, बचाव कार्य सुरू

Uttrakhand Uttarkashi Tunnel Collapsed : उत्तराखंड सरकार आणि एनडीआरएफने बचाव कार्य सुरू केलं असून या सर्व मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. 

Uttrakhand News : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळला (Uttrakhand Uttarkashi Tunnel Collapsed) आहे. या बोगद्यात 36 मजूर अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही.

उत्तराखंड सरकार आणि प्रशासनाच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. आतमध्ये कामगारांसाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. बोगद्याच्या आत एक अतिरिक्त ऑक्सिजन पाईप देखील देण्यात आला आहे. बोगद्यात सर्व कामगार सुरक्षित आहेत. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वारापासून सिल्क्यराकडे जाणाऱ्या 200 मीटर अंतरावर ही भूस्खलन झाली, तर बोगद्यात काम करणारे कामगार प्रवेशद्वाराच्या 2800 मीटर आत होते.

घटनेची माहिती मिळताच उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदत व बचाव कार्य सुरू केलं. पोलीस, एनडीआरएफ टीम, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, आपत्कालीन 108 आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL), बोगदा बांधणारी संस्था (NHIDCL) चे कर्मचारीही घटनास्थळी बोगदा उघडण्यात व्यस्त आहेत. चार धाम रोड प्रकल्पांतर्गत या बोगद्याच्या निर्मितीमुळे उत्तरकाशी ते यमुनोत्री धाम हा प्रवास 26 किलोमीटरने कमी होणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडला होता, ज्यामुळे लोकांना जीव गमवावा लागला होता आणि इमारती, रस्ते आणि महामार्गांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता ही मोठी दुर्घटना घडली आहे. 

या वर्षी ऑगस्टमध्ये, शिवपुरी भागातील पुराच्या प्रवाहाच्या पाण्याने भरलेल्या ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे लाईन प्रकल्पाच्या 'एडिट-II' नावाच्या बोगद्यात सुमारे 114 कामगार अडकले होते. मात्र, पोलिसांच्या पथकाने पाणी बाहेर काढले आणि दोरीच्या सहाय्याने सर्व 114 कामगारांची सुटका केली होती.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Congress: श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?
श्यामकुमार बर्वेंनी प्रतिभा धानोरकरांना चापट मारली? दिल्ली रॅलीदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल; काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार, अनुशासनात्मक कारवाईची मागणी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात

Embed widget