एक्स्प्लोर

गुन्हेगारीत उत्तर प्रदेश अव्वल, महाराष्ट्र देशात तिसरा

2016 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक (9.5 टक्के) गुन्हे नोंदवण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश (8.9 टक्के), महाराष्ट्र (8.8 टक्के) आणि केरळ (8.7 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात देशातील सर्वाधिक गुन्हेगारी माजल्याचं समोर आलं आहे. यूपीमध्ये 2016 मध्ये 9.5 टक्के गुन्ह्यांची नोंद झाली आहे. खेदाची बाब म्हणजे गुन्हेगारीच्या यादीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्यूरो (नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो - एनसीआरबी)ने 2016 सालातील जारी केलेली आकडेवारी जाहीर केली. 2016 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक (9.5 टक्के) गुन्हे नोंदवण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश (8.9 टक्के), महाराष्ट्र (8.8 टक्के) आणि केरळ (8.7 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या, तर अपहरणाच्या आणि लहान मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. 48 लाख 31 हजार 515 दखलपात्र गुन्ह्यांची नोंद गेल्या वर्षी झाली. त्यामध्ये 29 लाख 75 हजार 711 गुन्हे हे आयपीसी अंतर्गत तर 18 लाख 55 हजार 804 गुन्हे हे विशेष आणि स्थानिक कायद्यांअंतर्गत येतात. 2015 च्या तुलनेत (47 लाख 10 हजार 676 गुन्हे) यामध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे, उत्तर प्रदेशात 50 टक्के गुन्हेगारांवरील आरोप सिद्ध झाले आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रातील Rate of Conviction अवघा 11 टक्के आहे. हत्येच्या गुन्ह्यांमध्ये घट 2015 च्या तुलनेत देशात हत्यांच्या घटनांमध्ये 5.2 टक्क्यांनी घट झाली आहे. 2016 मध्ये 30 हजार 450 हत्यांचे गुन्हे नोंदवण्यात आले. दंगल (5 टक्के) आणि दरोडे (11.8 टक्के) या केसेसमध्येही गतवर्षीच्या तुलनेत घट आहे. मात्र अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये 6 टक्क्यांनी वाढ आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये 2.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये पती किंवा सासरच्या मंडळींनी केलेला छळ (32.6 टक्के), विनयभंग (25 टक्के), महिलांचं अपहरण (19 टक्के) आणि बलात्कार (11.5 टक्के) यांचा समावेश आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसरा 2015 मध्ये बलात्काराच्या 34 हजार 651 गुन्ह्यांची नोंद झाली होती. ते 2016 मध्ये 12.4 टक्क्यांनी वाढून 38 हजार 947 वर पोहचले आहेत. बलात्काराच्या घटनांमध्ये मध्य प्रदेश (4 हजार 882 केसेस - 12. 5 टक्के) अव्वल असून दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश ( 4 हजार 816 केसेस - 12.4 टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र ( 4 हजार 189 केसेस - 10.7 टक्के) आहे. लहान मुलांविरोधातील गुन्ह्यांमध्येही उत्तर प्रदेश अव्वल आहे. महाराष्ट्र दुसऱ्या, तर मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. अपहरणाच्या केसेसमध्येही उत्तर प्रदेश दबंग आहे. देशातील 54 हजार 723 घटनांपैकी 7 हजार 956 अपहरणाच्या घटना महाराष्ट्रात घडल्या. इथेही महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. 2016 मध्ये अनुसूचित जाती किंवा जमातींतील नागरिकांविरोधातील अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये 5.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 40 हजार 801 केसेसमध्ये उत्तर प्रदेश (20 हजार 426 केसेस - 25.6 टक्के) अव्वल असून त्यानंतर बिहार (5 हजार 701 केसेस - 14 टक्के) आणि राजस्थान ( 5 हजार 134 केसेस - 12.6 टक्के) यांचा क्रमांक लागतो. इतर ठळक मुद्दे : सायबर गुन्हेगारीमध्येही 2015 च्या तुलनेत 6.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 15 कोटी 92 लाख 50 हजार 181 रुपये किमतीच्या खोट्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक (2 कोटी 37 लाख 24 हजार 50 रुपये) खोट्या नोटा ताब्यात घेण्यात आल्या. त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. मेट्रो शहरांची आकडेवारी पाहता, दिल्लीमध्ये सर्वाधिक (38.8 टक्के) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर बंगळुरु (8.9 टक्के) आणि मुंबई (7.7 टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो. अपहरणाच्या केसेसमध्ये दिल्ली (5 हजार 453), तर मुंबई (1 हजार 876 ) दुसऱ्या स्थानी आहे. कोठडीत झालेल्या 60 मृत्यूंपैकी 12 महाराष्ट्रात झाले आहेत. एकूण 3 लाख 50 हजार 862 किलो वजनाचे विविध प्रकारचे ड्रग्ज 2016 मध्ये जप्त करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
Embed widget