Farmers Conference : राष्ट्रीय लोक दलाचं शेतकरी संमेलन रद्द, शामली जिल्ह्यात कलम 144 लागू, RLD चा भाजपवर हल्लाबोल
राष्ट्रीय लोक दलाच्या (RLD) वतीनं आयोजीत करण्यात आलेलं शेतकरी संमेलन रद्द करण्यात आलं आहे. येत्या तीन ऑक्टोबरला उत्तर प्रदेशमधील शामली (shamli) इथे हे शेतकरी संमेलन (farmers conference) होणार होतं.
RLD Farmers Conference Cancelled : राष्ट्रीय लोक दलाच्या (RLD) वतीनं आयोजीत करण्यात आलेलं शेतकरी संमेलन रद्द करण्यात आलं आहे. येत्या तीन ऑक्टोबरला उत्तर प्रदेशमधील शामली (shamli) इथे हे शेतकरी संमेलन (farmers conference) होणार होतं. प्रशासनानं या संमेलनाला परवानगी नाकारली आहे. मेघालयाचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) आणि जयंत चौधरी हे परिषदेला उपस्थिती दर्शवणार होते. शेतकरी संमेलन रद्द करण्यावरुन आरएलडीच्या नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपचं हे षडयंत्र असल्याचं आरएलडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
शामली जिल्ह्यात कलम 144 लागू
सत्यपाल मलिक आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करुन शुक्रवारी (30 सप्टेंबर) राज्यपालपदावरुन निवृत्त झाले आहेत. ते तीन ऑक्टोबरला होणाऱ्या शेतकरी संमेलनात हजेरी लावणार होते. मात्र, प्रशासनानं या संमेलनाला परवानगी नाकारली आहे. सत्यपाल मलिक या संमेलनाला हजेरी लावणार असल्यानं त्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आल्याचा आरोप
आरएलडीच्या नेत्यांनी केला आहे. तसेच हे भाजपचं षडयंत्र असल्याचा हल्लाबोल देखील केला आहे. राष्ट्रीय लोकदलचे आमदार असरफ अली आणि सदर शामलीचे आमदार प्रशांत चौधरी यांनी किसान संमेलन रद्द झाल्याची माहिती दिली आहे. शामली जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे तीन ऑक्टोबर रोजी होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. या बैठकीत आरएलडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जयंत चौधरी आणि राज्यपाल सतपाल मलिक एकाच व्यासपीठावर येणार होते.
आरएलडीचा भाजपवर आरोप
आरएलडीचे आमदार असराफ अली यांनी भाजपवर किसान संमेलन रद्द करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. आरएलडीने शेतकऱ्यांचा प्रश्न मांडावे असं भाजपला वाटत नसल्याचे ते म्हणाले. तसेच यामागचे आणखी एक कारण सांगताना ते म्हणाले की, या सभेत सत्यपाल मलिकही आरएलडीच्या समर्थनार्थ येत होते. जे भाजपला सहन होत नव्हते. त्यामुळं भाजपने जाणीवपूर्वक या भागात कलम 144 लागू केल्याचे अली यांनी म्हटलं आहे.
शेतकरी संमेलन पुढे ढकलंलं
आमच्या पक्षाने शेतकरी संमलेनाबाबत सभेच्या परवानगीसाठी जिल्हा अधिकार्यांना कळवले होते, त्यानंतर प्रशासनाने या भागात कलम 144 लागू केल्याचा आरोप आरएलडीचे आमदार प्रशांत चौधरी यांनी केला आहे. सध्या शामली जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळं पक्षानं शेतकरी संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आमदार प्रशांत चौधरी यांनी दिली. राज्यपाल सतपाल मलिक देखील या कार्यक्रमात सहभागी होणार होते. त्यामुळं प्रशासनानं कलम 144 लागू केल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: