एक्स्प्लोर
टॉर्चच्या प्रकाशात 32 शस्त्रक्रिया, वैद्यकीय अधिकाऱ्याची हकालपट्टी
लखनौपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या उन्नावमधील एका सरकारी आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री हा प्रकार घडला.
उन्नाव (उत्तर प्रदेश) : टॉर्चच्या प्रकाशात 32 रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करणं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अंगलट आलं आहे. उत्तर प्रदेशातील उन्नावमधल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे.
लखनौपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या उन्नावमधील एका सरकारी आरोग्य केंद्रात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. टॉर्चच्या प्रकाशात 32 जणांवर मोतिबिंदूचं ऑपरेशन करण्यात आलं. हा प्रकार मोबाईल कॅमेरावर शूट करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शस्त्रक्रिया झालेले रुग्ण हे उन्नाव आणि शेजारच्या कानपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील गरीब रुग्ण आहेत. कानपूरमधील जगदंबा सेवा समिती या एनजीओने या रुग्णांना सरकारी आरोग्य केंद्रात आणलं होतं. सर्व रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
एनजीओने या सर्व शस्त्रक्रियांसाठी कानपूरमधील डॉक्टरला पाचारण केलं होतं. वीज गेल्यास जनरेटरची व्यवस्थाही संबंधित डॉक्टरकडून करण्यात येणार होती, असा दावा करण्यात आला आहे. त्यातच, संबंधित आरोग्य केंद्रातील सरकारी डॉक्टर या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार होता, मात्र त्यानेही दांडी मारली.
दरम्यान, दिवसा ऑपरेशन करण्याची सक्ती असताना रात्रीची वेळ का निवडण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचप्रमाणे वीज गेल्यावर जनरेटर का सुरु करण्यात आलं नाही, तेही समजू शकलेलं नाही. त्याचप्रमाणे 24 तास रुग्णांवर देखरेख करणं आवश्यक असताना, त्यांना सकाळीच डिस्चार्ज दिल्यानेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement