(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mathura Train Accident : रेल्वे अपघातावेळी कर्मचारी व्हिडीओ कॉलवर गुंग? एक्सलरलेटरवर बॅग ठेवल्याने अपघात; थराराचा CCTV VIDEO समोर
Uttar Pradesh Mathura Train Accident : मथुरा रेल्वे अपघातावेळी रेल्वे कर्मचारी बेजबाबदारपणे व्हिडीओ कॉलवर असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
UP Mathura Train Accident : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मथुरामध्ये (Mathura) मंगळवारी रात्री उशिरा रेल्वे अपघात (Train Accident) घडला. ट्रेन थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Railway Platform) चढली. आता या घटनेवेळी ट्रेनच्या आतमधील व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ अपघातग्रस्त ट्रेनच्या लोको पायलटच्या केबिनमधील आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ट्रेनचा लोको पायलट एएमयू (EMU) इंजिनच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर दुसरा रेल्वे केबिनमध्ये येतो आणि त्यानंतर हा अपघात घडतो असं स्पष्टपणे दिसत आहे. हा कर्मचारी व्हिडीओ कॉलवर बोलत EMU इंजिनमध्ये दाखल होताना दिसत आहे.
रेल्वे कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अपघात?
ट्रेनच्या केबिनमधील समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, ट्रेनचा लोको पायलट पॅनल बंद करून EMU इंजिन बाहेर पडतो. त्यानंतर दुसरा रेल्वे कर्मचारी येतो. हा लाईटनिंग कर्मचारी व्हिडीओ कॉलवर बोलत इंजिनमध्ये येतो. त्यानंतर तो त्याच्या खांद्यावरील बॅग काढून कंट्रोल पॅनेलवर ठेवताना दिसत आहे. हा कर्मचारी निष्काळजीपणाने एक्सलरेटरवर बॅग ठेवतो यावेळी तो बोलण्यात व्यक्त असल्याचं दिसत आहे.
थराराचा व्हायरल सीसीटीव्ही VIDEO
This is video footage of Mathura EMU Accident, CCTV footage as available on social media.
— Mumbai Railway Users (@mumbairailusers) September 27, 2023
Motorman not leaving the mobile even after accident
That's is why Mumbai Motormen doesn't want CCTV cameras inside cab. @AshwiniVaishnaw @RailMinIndia @Mumbaikhabar9 @mumbaitraffic pic.twitter.com/OZsSKmQ2Xn
कर्मचारी व्हिडीओ कॉलवर व्यस्त अन् एक्सलरलेटरवर बॅग
थ्रोटलवरील एक्सलरेटवर बॅग ठेवल्याने ट्रेन सुरु होते. पण ट्रेनच्या पुढे रेल्वे रुळ संपून डेड एंड असल्यामुळे ट्रेन बॅरिअर तोडून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर 30 मीटरवर चढते आणि विजेच्या खांबाला आदळून थांबते. अशाप्रकारे हा अपघात घडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
#WATCH उत्तर प्रदेश: शकूरबस्ती से आ रही EMU ट्रेन मथुरा जंक्शन पर ट्रैक छोड़कर प्लेटफॉर्म पर चढ़ गई। (26.09) pic.twitter.com/TmbQCJPUiM
— ANI_HindiNews (@AHindinews) September 26, 2023
लाईटनिंग कर्मचारी दारुच्या नशेत
दरम्यान, या व्हिडीओमध्ये दिसणारा दुसरा कर्मचारी लाईटनिंग स्टाफ असून त्याचं नाव सचिन असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच लाईटनिंग कर्मचारी या अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत असल्याचंही समोर आलं आहे. या कर्मचाऱ्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीतून त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण समजेल. लाईटनिंग कर्मचाऱ्याच्या निष्काळजी आणि बेजबाबदारपणामुळे हा रेल्वे अपघात घडल्याचं समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
व्हिडीओ संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसून रेल्वे प्रशासनाकडूनही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.