एक्स्प्लोर
उत्तर प्रदेशात काँग्रेस-सप आघाडीचं वर्चस्व : एबीपी सर्व्हे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीची जादू चालण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज, लोकनीति आणि सीएसडीएसनं केलेल्या सर्व्हेनुसार सपा आणि काँग्रेसची आघाडी बहुमताच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी अखिलेश यादव यांना पसंती देण्यात आली आहे. अखिलेश यांच्या लोकप्रियतेत किंचीतशी घट असली, तरी आघाडीमुळे ते सत्तेच्या जवळ आल्याचं चित्र सर्व्हेत आहे. यूपीच्या निवडणूक रणसंग्रामात भाजपच्या विरोधात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनं आघाडी केली आहे, तर बसपसुद्धा पाच वर्षांनी सत्तेत पुनरागमन करण्याच्या बेतात आहे. एबीपी न्यूज-लोकनीति आणि सीएसडीएस यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये अखिलेश यादव यांच्या लोकप्रियतेविषयी विचारणा करण्यात आली. डिसेंबरच्या तुलनेत (काँग्रेस-सपच्या आघाडीपूर्वी) अखिलेश यांच्या लोकप्रियतेत थोडीशी घट होऊन ती 28 टक्क्यांवरुन 26 टक्क्यांवर आली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी कोण फेवरिट? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी अखिलेश यादव यांना 26 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. बसपच्या सुप्रिमो मायावती यांना 21 टक्के तर भाजपच्या राजनाथ सिंह यांना 3 टक्के जनतेने पसंती दिली आहे. आघाडीचा फायदा कोणाला? समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीचा फायदा कोणाला होईल, या प्रश्नाला 37 टक्के जणांनी सपला होईल असं मत नोंदवलं. 43 टक्के नागरिकांनी यावर काहीच मत दिलं नाही. युवकांमध्ये सप लोकप्रिय 18 ते 25 वर्ष वयोगटातील युवावर्गात समाजवादी पक्षाची लोकप्रियता दिसून आली. 38 टक्के तरुणांना सप-काँग्रेस आघाडी, 31 टक्के युवकांना भाजप तर बसपला 23 युवकांची पसंती मिळाली. 26 ते 45 वर्षे वयोगटातही समाजवादी पक्षच फेवरिट आहे. नोटाबंदीचा निर्णय योग्य असल्याचं 41 टक्के नागरिकांनी म्हटलं आहे. गावामध्येही समाजवादी पक्षच लोकप्रिय सप-काँग्रेस आघाडी - 35 टक्के भाजप युती - 27 टक्के बसप - 24 टक्के शहरामध्ये आघाडी-भाजपमध्ये काँटे की टक्कर सप-काँग्रेस आघाडी - 35 टक्के भाजप युती - 35 टक्के बसप - 19 टक्के कोणता समाज कोणत्या पक्षासोबत? सवर्ण सप - 21 टक्के भाजप - 59 टक्के बसप - 8 टक्के मुस्लिम सप - 74 टक्के भाजप - 11 टक्के बसप - 11 टक्के यादव सप - 73 टक्के भाजप - 12 टक्के बसप - 5 टक्के अन्य ओबीसी सप - 20 टक्के भाजप - 34 टक्के बसप - 16 टक्के जाट सप - 8 टक्के भाजप - 10 टक्के बसप - 79 टक्के कोणत्या पक्षाला किती टक्के मतं सप-काँग्रेस - 35 टक्के भाजप - 29 टक्के बसप - 23 टक्के कोणत्या पक्षाला किती जागा सप - 187-197 भाजप - 118-128 बसप - 76-86
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























