Uttar Pradesh Assembly Election Result : देशभराचं लक्ष लागलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. पाच राज्यांच्या निकालामध्ये सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाकडे आहे. उत्तरप्रदेशची सत्ता कोणाच्या हाती जाणार यावर सट्टा बाजारात तब्बल 300 कोटींहून अधिकचा सट्टा लावण्यात आला आहे. एक्झिट पोलनंतर आता सट्टेबाजाराचा कल सध्या भाजपकडे अधिक आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा घटणार असून समाजवादी पक्षाच्या जागा वाढणार  आहे.


पाच राज्यात झालेल्या निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर झाला. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजप उत्तर प्रदेशातील सत्ता कायम ठेवेल. मात्र, त्यांच्या जागा कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशभरातील सट्टाबाजारातही भाजपकडे कल आहे. 


राजस्थानमधील फलौदी सट्टा बाजारात भाजप विजयी ठरेल असा अंदाज वर्तवला आहे. फलौदी सट्टा बाजारानुसार भाजपा 223-230,  समाजवादी पक्ष  135-145,  काँग्रेस 3-5 आणि बहुजन समाज पक्ष  20-25 जागांवर विजयी ठरू शकतो. 


गुजरात सट्टा बाजारानुसार,  भाजपा 220-226, समाजवादी पक्ष 135-140, काँग्रेस 2-3 आणि बहुजन समाज पक्ष 32-35 जागांवर विजयी ठरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


मुंबईतील सट्टा बाजारानेदेखील भाजपच्या बाजूने कल दाखवला आहे. मुंबईतील सट्टा बाजारात भाजपला 210-218, समाजवादी पक्षाला 120-123, काँग्रेसला 2-3, बहुजन समाज पक्षाला 55-59 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


मध्यप्रदेश सट्टा बाजारानुसार भाजपा  215-227, समाजवादी पक्ष 140-143, काँग्रेस 3-5, बहुजन समाज पक्ष  25-28 जागांवर विजयी ठरू शकतो. 


दिल्ली सट्टा बाजारानुसार, भाजपा  219-223,  समाजवादी पक्षाला 125-132, काँग्रेस 3-5, बहुजन समाज पक्षाला 40-45 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


सट्टा बाजारातील कलानुसार उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार आहे. मात्र, त्यांना जवळपास 100 जागांचा मोठा फटका बसणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: