UP Election 2022 : "भाजपचा ज्या-ज्या ठिकाणी पराभव होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी मतमोजणी संथ गतीने करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांचे फोन येत आहेत. याशिवाय वाराणसीला ईव्हीएम घेऊन जात असताना आज  एक ट्रक पकडला आहे. यावेळी दोघे जण ट्रक घेऊन पळून गेले आहेत, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे. 


अखिलेश यादव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर अनेक आरोप केले आहेत. अखिलेश यादव म्हणाले, "सरकार मतांची चोरी करत नाही तर ईव्हीएम घेऊन जाणारे एक वाहन कसे पकडले? आणि दोन वाहने पळून का गेली? मतांची चोरी होत नसेल, तर ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाड्यांना प्रशासनाने सुरक्षा का पुरवली नाही? 
 
"ईव्हीएम मशीन एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचे असेल तर त्या मतदारसंघातील उमेदवाराला माहिती द्यावी लागते. परंतु. वाराणसीला घेऊन जात असलेल्या ईव्हीएमची माहिती संबंधित उमेदवाराला देण्यात आली नव्हती, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.







"मतमोजणी होईपर्यंत अशा प्रकारांवर लक्ष ठेवा. याबरोबरच ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी कोणीही ये-जा करू नये, याची खबरदारी घ्या, असे आवाहन अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केले आहे. पत्रकार परिषदेपूर्वी अखिलेश यादव यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "वाराणसीत ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची बातमी उत्तर प्रदेशमधील प्रत्येक विधानसभेला सतर्क राहण्याचा संदेश देत आहे. मतमोजणीत होणारा हेराफेरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सपा-आघाडीच्या सर्व उमेदवार आणि समर्थकांनी आपापले कॅमेरे घेऊन तयार राहा, असे आवाहन अखिलेश यादव यांनी केले आहे. 


महत्वाच्या बातम्या