Exit Poll 2022 Live Updates : पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल, पाहा प्रत्येक अपडेट्स

ABP C-Voter Exit Poll 2022: पाच राज्यांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने केलेल्या 'Exit Poll 2022'ची प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Mar 2022 07:37 PM

पार्श्वभूमी

ABP C-Voter Exit Poll 2022:  पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 10 मार्च रोजी मतमोजणीनंतर उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा (Uttar Pradesh, Punjab,...More

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी सरकार

सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एकूण 403 सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी एकूण 202 जागांची गरज आहे. भाजपला यावेळीही स्पष्ट बहुमत मिळणार तर अखिलेश यादव सत्तेपासून दूर राहणार असंच या एक्झिट पोलमधून दिसतंय.