UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यूपी सरकारवर ईव्हीएम मशीनबाबत गंभीर आरोप केले आहेत. अखिलेश यादव यांनी ट्विट करून म्हटले आहे की, वाराणसीमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची बातमी यूपीच्या प्रत्येक विधानसभेला सतर्क राहण्याचा संदेश देत आहे. मतमोजणीत हेराफेरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सपा-आघाडीच्या सर्व उमेदवार आणि समर्थकांनी आपले कॅमेरे घेऊन सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनीही व्हिडीओ जारी करून निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. या आरोपांवर प्रतिक्रिया देत वाराणसीचे जिल्हा दंडाधिकारी कौशल राज शर्मा म्हणाले की, मंडीतील एका वेगळ्या खाद्य गोदामात बनवलेल्या स्टोरेजमधून ईव्हीएम प्रशिक्षणासाठी यूपी कॉलेजमध्ये जात होते, तेव्हा काही राजकीय लोकांनी ते वाहन थांबवले आणि निवडणुकीत वापरले ईव्हीएम असल्याची अफवा पसरवली.
राज शर्मा यांनी सांगितले की, 'आज मोजणी प्रक्रियेतील कर्मचार्यांचे दुसरे ट्रेनिंग आहे आणि या ईव्हीएम मशीन नेहमी प्रशिक्षणासाठी वापरल्या जातात. जे ईव्हीएम निवडणुकीत वापरले गेले ते सर्व सीआरपीएफच्या ताब्यातील स्ट्राँग रूममध्ये सीलबंद आहेत आणि तेथे सीसीटीव्ही निगराणी आहे, जी सर्व राजकीय पक्षांचे लोक पाहत आहेत.
अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उमेदवाराला माहिती दिल्याशिवाय ईव्हीएम दुसऱ्या ठिकाणी हलवू शकत नाही. ईव्हीएम हलवायचे असेल तर किमान निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना माहिती द्यावी लागते. परंतु वाराणसीला घेऊन जात असलेल्या ईव्हीएमची माहिती संबंधित उमेदवाराला देण्यात आली नव्हती, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- UP Election 2022: दुर्बिणीने EVM वर लक्ष ठेवत आहेत समाजवादी पक्षाचे उमेदवार, जाणून घ्या काय आहे कारण
UP Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या टप्प्यात कुणाला किती जागा?, पाहा काय म्हणतोय एक्झिट पोल
- UP Assembly Election 2022 : यूपीमध्ये मतदानाचा शेवटचा टप्पा, योगींसह अखिलेश यादव यांनी केला 300 जागांवर दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha