UPSC 2022 Results: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांचा निकाल (Result) जाहीर करण्यात आला आहे. या निकालात पहिल्या तीन स्थानावर मुलींनी स्थान पटकावत बाजी मारली आहे. इशिता किशोर हि देशांतून पहिली आली आहे. तर गरिमा लोहिया ही देशांतून तिसरी आणि उमा हरिथी हि देशातून तिसरी आली आहे. हा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळ www.upsc.gov.in यावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्रात देखील मुलींची बाजी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यंदा मुलींचा दबदबा पाहायला मिळाला आहे. पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी स्थान पटकावले आहे. तर महाराष्ट्रात देखील पहिल्या स्थानावर मुलींनी बाजी मारली आहे. ठाण्याची कश्मीरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तर कश्मीरा ही देशातून 25 वी आली आहे. कश्मीराचा हा तिसरा प्रयत्न होता. तिने याआधी दोन वेळा प्रयत्न केला होता परंतु यंदा तिच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. कश्मीराचे बाबा एका खासगी कंपनीत कामाला आहेत तर तिची आई देखील नोकरी करते.
(25) कश्मिरा संखे, (28) अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) श्री मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडेपाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265). दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (380) ओमकार गुंडगे (393) परमानंद दराडे, (396) मंगेश खिल्लारी, (410) रेवैया डोंगरे (445) सागर खरडे, (452) पल्लवी सांगळे (463) आशिष पाटील, (470) अभिजित पाटील, (473) शुभाली परिहार, (493) शशिकांत नरवडे, (517) रोहित करदम, (530) शुभांगी केकण, (535) प्रशांत डगळे, (552) लोकेश पाटील, (558) ऋतविक कोत्ते, (560) प्रतिक्षा कदम, (563) मानसी साकोरे, (570) सैय्यद मोहमद हुसेन, (580) पराग सारस्वत, (581) अमित उंदिरवडे, (608) श्रुति कोकाटे, (624) अनुराग घुगे, (635) अक्षय नेरळे, (638) प्रतिक कोरडे, (648) करण मोरे, (657) शिवम बुरघाटे, (663) राहुल अतराम, (665) गणपत यादव, (666) केतकी बोरकर, (670) प्रथम प्रधान, (687) सुमेध जाधव, (691) सागर देठे, (693) शिवहर मोरे, (707) स्वप्निल डोंगरे, (717) दिपक कटवा, (719) राजश्री देशमुख, (750) महाऋद्र भोर, (762)अकिंत पाटील, (790) विक्रम अहिरवार, (792) विवेक सोनवणे, (799) स्वप्निल सैदाने, (803) सौरभ अहिरवार, (828) गौरव अहिरवार, (844) अभिजय पगारे, (861) तुषार पवार, (902) दयानंद तेंडोलकर, (908) वैषाली धांडे, (922) निहाल कोरे.
इतके विद्यार्थी झाले उत्तीर्ण
अंतिम निकालात एकून 933 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 345 विद्यार्थी यामध्ये सामान्य (खुला) गटातून - 345, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) - 263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) - 154, अनुसूचित जमाती प्रवर्गातून - 72 उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 178 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. तसेच आयएएस पदावर निवड करण्यासाठी 180 विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका 15 दिवसांनी मिळणार असल्याची माहिती आता मिळत आहे. एप्रिलपर्यंत 118 विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीच्या फेरीला 30 जानेवारीपासून सुरुवात झाली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येते.
यंदा अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांची यादी
1. इशिता किशोर
2. गरिमा लोहिया
3. उमा हरति एन
4. स्मृति मिश्रा
5. मयूर हजारिका
6. गहना नव्या जेम्स
7. वसीम अहमद भट
8. अनिरुद्ध यादव
9. कनिका गोयल
10. राहुल श्रीवास्तव