एक्स्प्लोर

बँकेत मास्क न घातल्यामुळं सुरक्षारक्षकानं ग्राहकाला घातली गोळी!, यूपीतील खळबळजनक घटना 

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेत मास्क न घातल्यामुळं सिक्युरिटी गार्डनं ग्राहकाला गोळी घातल्याची ही घटना आहे.

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेत मास्क न घातल्यामुळं सिक्युरिटी गार्डनं ग्राहकाला गोळी घातल्याची ही घटना आहे. या घटनेत जखमी झालेल्या ग्राहकाला दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. तर गोळी घालणाऱ्या सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. मास्क लावा म्हटल्यानंतर शिवीगाळ केल्यानंतर आमच्यात भांडण झालं यात चुकुन गोळी लागली असं सुरक्षारक्षकानं सांगितलं आहे.  बरेली जंक्शन मार्गावर असलेल्या बॅंक ऑफ बडोदामध्ये ही घटना घडली आहे. 

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सदर ग्राहक राजेश कुमार आणि सुरक्षारक्षक केशवप्रसाद मिश्र यांच्यात बॅंकेत काही कारणांनी वाद झाला. त्यानंतर हा वाद इतक्या टोकाला पोहोचला की सुरक्षारक्षक केशवप्रसादनं राजेशकुमारला गोळी घातली.  बरेली जंक्शन मार्गावर असलेल्या बॅंक ऑफ बडोदामध्ये ही घटना घडली. बरेलीचे पोलिस अधीक्षक रविंद्र कुमार यांनी सांगितलं की, शुक्रवारी जवळपास 11:30 वाजता राजेश कुमार बँकेच्या कामानिमित्त शाखा परिसरात आला. यावेळी तिथला सुरक्षारक्षक केशव प्रसाद मिश्र आणि राजेश कुमारमध्ये काही कारणावरुन वाद झाला. 

या वादानंतर केशव प्रसाद मिश्रानं रागात येऊन राजेश कुमारला गोळी घातली. जखमी झालेल्या राजेश कुमारला दवाखान्यात दाखल केलं आहे. तो अद्याप बेशुद्ध आहे त्यामुळं त्याची बाजू समजू शकलेली नाही, असं एसपी रविंद्र कुमार यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, राजेश बँकेच्या कामानिमित्त तिथं आला होता. तो शुद्धीवर आल्यावर त्याची बाजू कळू शकेल.  या बँकेच्या वरिष्ठ अधिकारी गीता भुसाल यांनी सांगितलं की, पोलिस आणि फॉरेंसिक टीम सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहेत. ते पाहिल्यानंतर त्यांना घटनेच्या संदर्भात अधिक माहिती मिळू शकेल. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस महानिरीक्षक बरेली रमित शर्मा, एसएसपी रोहित सिंह सजवाण, एसपी रविंद्र कुमार घटनास्थळी पोहोचले. दरम्यान या प्रकरणी सुरक्षारक्षक केशव प्रसादला अटक केली आहे. केशवप्रसादनं सांगितलं की, ते (राजेश कुमार) ज्यावेळी बँकेत आले, त्यावेळी त्यांनी मास्क लावला नव्हता. त्यांना मास्क लावा म्हटल्यानंतर मला शिवीगाळ केली. यामुळं आमच्यात भांडण झालं. यात चुकुन त्यांना गोळी लागली असं सुरक्षारक्षकानं सांगितलं आहे.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Droupadi Murmu : ममता बॅनर्जींना मी माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण...; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांचीही टीका
ममता बॅनर्जींना मी माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण...; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांचीही कठोर शब्दात टीका
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
Embed widget