Mulayam Singh Yadav Health Update : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav ) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मेदांता रूग्णालयाने (medanta hospital ) दिली आहे. मुलायमसिंह यादव यांचे हेल्थ बुलेटिन रूग्णालायाने जारी केले आहे. त्यामध्ये मुलायमसिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमधून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली आहे. मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास आहे. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले. सध्या आयसीयूमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संजीव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजणक आहे आणि ते जीवनरक्षक औषधांवर आहेत. गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मोठ्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. समाजवादी पक्षाकडून रुग्णालयाचे हे बुलेटिन शेअर करण्यात आले आहे.
गेल्या आठवडाभरापासून प्रकृती चिंताजनक
मुलायमसिंह यादव यांना महिनाभराहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करूनही त्यांची प्रकृती गेल्या आठवडाभरात झपाट्याने खालावली आहे. त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांचा मुलगा आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे मेदांता रुग्णालयात उपस्थित आहेत, तर भाऊ शिवपाल सिंह यादव हे रोज रुग्णालयात येत आहेत. मुलायम सिंह यांचे नातेवाईक आणि विविध राजकीय पक्षांचे नेते त्यांची काळजी घेण्यासाठी मेदांता हॉस्पिटलमध्ये येऊन जात आहेत. सध्या ते ते जीवनरक्षक औषधांवर आहेत.
महत्वाच्या बातम्या