Amit Shah Meeting With Jat Leaders : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये बाहुल्य असलेल्या जाट समुदायाला भाजपकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु झालेत. कोरोनानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी आज भाजप खासदार प्रवेश वर्मा यांच्या घरी जाट नेत्यांसोबत बैठक घेतली. यावेळी यूपीतील 253 जाट नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होते.
मेरठ, सहारनपूर, मुजफ्फनगर या पश्चिम यूपीतील जिल्ल्ह्यातील जाट नेत्यांचा बैठकीत समावेश होता. संजीव बालियान, कॅप्टन अभिमन्यु, जाट महासभा अध्यक्ष सुभाष चौधरी उपस्थित होते. भाजपचे काही आमदारही या बैठकीला उपस्थित होते. जाट समुदाय नेहमीच भाजपच्या बाजूने उभा राहिलाय असं वक्तव्य संजीव बालियान यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केलं. जाट नेत्यांचं तोंड गोड करण्यासाठी खास मेरठचा गूळ बैठकीत ठेवण्यात आला होता. यावेळी बैठकीत जाट नेत्यांनी जाट एकता झिंदाबाद आणि जाट देवता झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जाट नेत्यांनी अमित शाहांसमोर दोन मागण्या ठेवल्या. यामध्ये ऊसाचे बील 14 दिवसाक मंजुर करावे ही पहिली मागणी करण्यात आली आणि जाट समाजाला आरक्षण मिळावे ही दुसरी मागणी करण्यात आली. अमित शाह यांनी निवडणुकीनंतर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
या बैठकीत अमित शाह यांन आरएलडीचे जयंत चौधरी यांना आघाडीची ऑफर दिली. अमित शाह बैठकीत म्हणाले, चौधरी चरण सिंह यांचा आदर करतो. त्यांचे वंशज जयंत चौधरी यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत. भविष्यात त्यांना कधीही आमच्याशी चर्चा करायची असेल तर त्यांच्यासाठी कायम दरवाजे खुले असणार आहे.
संबंधित बातम्या :
- अजय बिष्ट... गोरखपूरचे मठाधिपती ते यूपीचे मुख्यमंत्री! कसा आहे योगी आदित्यनाथांचा प्रवास
- UP Election 2022 : 'सिंपल डिंपल' अखिलेशला भावली अन्.... जाणून घ्या अखिलेश यादवांची भन्नाट लव्ह स्टोरी
- UP Election 2022 : जेव्हा अखिलेश यादव अमित शाहांना फॉलो करतात!....म्हणून शरद पवार अखिलेश यांच्या पाठिशी!
भाजपच्या या ऑफरनंतर जयंत चौधरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जयंत चौधरी ट्विट करत म्हणाले, निमंत्रण मला नाही, तर त्या 700 पेक्षा अधिक कुटुंबांना द्या ज्यांना तुम्ही बेघर केले आहे. तर बैठकीनंतर प्रवेश वर्मा म्हणाले, बैठक व्यवस्थित पार पडली. जयंत चौधरी चुकीच्या मार्गाने जात आहे, यावर समाजातील लोकांचे एकमत झाले आहे. आम्ही त्यांच्याशी बोलणार आहे. निवडणुकीनंतर परतायचे की नाही हे त्यांनी ठरवायचे आहे