एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपने उत्तर प्रदेशचं युद्ध कसं जिंकलं? 10 कारणे
लखनऊ: उत्तर प्रदेशात भाजपने अक्षरश: घोडदौड करत विरोधकांचा सूफडा साफ केल्याचं चित्र आहे. सकाळी 11 पर्यंतच्या कलानुसार भाजपने 300 जागांवर आघाडी घेतली होती.
या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतात, मात्र 403 जागांपैकी 300 जागांवर आघाडी असणं हा मोठा विजय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तर प्रदेशातील तळ, भाजपची रणनीती आणि कार्यकर्त्यांची बांधलेली मोट यामुळे भाजपने मोठी भरारी घेतली.
भाजपला उत्तर प्रदेशात इतकं मोठं यश का मिळालं? भाजपच्या विजयाची 10 कारणं -
1) यूपीत भाजपने 1 कोटी 80 लाख नवे कार्यकर्ते तयार केले, 90 हजार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं
2) 1 लाख 47 हजार बूथवर 13 लाख 50 हजार कार्यकर्ते तैनात केले
3) कार्यकर्त्यांनी पक्षासाठी 17 कोटी रुपये जमवले
4) यूपीत सर्व जागांवर अमित शहांची परिवर्तन रॅली
5) 8 हजार किमीच्या प्रचार यात्रेत 50 लाख लोकांशी संवाद
6) तरुण, महिला, मागास, दलित आणि व्यापाऱ्यांची संमेलनं
7) शेतकऱ्यांसाठी किसान सभा, 'माटी – तिलक' शपथ रॅली
8) 60 कमकुवत जागी अधिक ताकद लावली
9) मोदींचं नेतृत्व आणि प्रभावी रणनीती विजयाचं मुख्य कारण
10) प्रचारादरम्यान बंडखोर नेते आणि प्रभावी जातींना आपल्याकडे वळवण्यात यश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
निवडणूक
Advertisement