एक्स्प्लोर

सपा, काँग्रेस, अखिलेश आणि मायावती म्हणजे SCAM, मोदींचा घणाघात

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील SCAM म्हणजे समाजवादी पक्ष, काँग्रेस, अखिलेश आणि मायावती आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला. उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मेरठमध्ये सभा झाली. यावेळी मोदींनी समाजवादी पक्षासह काँग्रेसवरही जोरदार टीका केली. 'काँग्रेसवाले उत्तर प्रदेश सरकारला बदनाम करत होते, त्यांच्या कारभारावर टीका करत होते. मात्र आता सत्तेसाठी गळ्यात गळे घालत असल्याचंही मोदी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीवर जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले की, ''जोपर्यंत उत्तरप्रदेशातून SCAM संपुष्टात येत नाही, तोपर्यंत उत्तर प्रदेशाचा विकास होणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची या SCAM विरोधात लढाई सुरु आहे. या SCAM मधील S म्हणजे समाजवादी पक्ष, C म्हणजे काँग्रेस, A म्हणजे अखिलेश यादव आणि M म्हणजे मायावती आहेत,'' असं त्यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय मोदींना या प्रचारसभेत बोलताना, अखिलेश सरकारवर अनेक मोठे आरोप लावले. ते म्हणाले, ''केंद्र सरकारने उत्तर प्रदेशात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी चार हजार कोटी रुपये दिले. पण त्यातील 250 कोटी रुपये ही सरकार खर्च करु शकली नाही. यानंतर पुन्हा सात हजार कोटी रुपये दिले. पण त्यातील 280 कोटी रुपयेही सरकारने जनतेवर खर्च केले नाहीत.'' मोदींनी मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील वादावरही चांगलेच तोंडसुख घेतलं. ते म्हणाले की, ''सध्या अखिलेश सरकार कौटुंबिक वादाशी सामना करत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार उत्तर प्रदेशातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व काही देण्यासाठी तयार आहे. पण इथे एका कुटुंबात अस्तित्वाचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश मधल्या जनतेने सरकार बदलले, तर भविष्य नक्की बदलेल,'' असा विश्वास व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा आश्वासनांचे गाजर, आता थेट आरपारची लढाई, ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींचा एल्गार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget