Covid Update: देशभरात दिवसागणिक कोरोनाबाधितांची (Corona) संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसह प्रशासनानेही सतर्कता बाळगली आहे. देशातील महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, कर्नाटकसह अनेक राज्यांत कोरोना रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत वाढत्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संवाद साधणार आहेत. 






कोरोनाने देशात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. काल दिवसभरात देशात तब्बल 1 लाख 59 हजार 632 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रूग्णांची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे. वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता राज्यातील निर्बंधात वाढ करण्यात आली आहे. 


पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक
दरम्यान, देशभरातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या  अध्यक्षतेखाली आज दुपारी साडे चार वाजता महत्त्वाची बैठक  पार पडली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि  आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया देखील सहभागी झाले होते. 


ओमायकॉनच्या रूग्णांमध्ये वाढ
कोरोना रूग्णांसह ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात आतापर्यंत 3 हजार 623 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. देशातील ओमाक्रॉनच्या 1 हजार 409 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे तर ओमायक्रॉनमुळे देशात आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.


महत्वाच्या बातम्या