ASL Report : पंजाब दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी एएसएलचा रिपोर्ट आला आहे. या रिपोर्टमध्ये 1 जानेवारी एसपीजी आणि पंजाब पोलिसांमध्ये चर्चा झाली यामध्ये सर्व पर्यायांचा विचार करण्यात आला होता. 3 जानेवारीला एसपीजीने पंजाब पोलिसांनी एक पत्र पाठवले होते. या पत्रात खराब वातावरण झाल्यास इतर पर्यायी मार्गांचा वापर करण्यात येण्याविषयी चर्चा करण्यात आली होती. तर  दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी रस्त्याने जाण्याचा पर्याय अचानक स्विकारला असे पंजाब सरकारने म्हटले आहे. परंतु एएसएलचा रिपोर्टनुसार यावर अगोदरच चर्चा झाल्याती माहिती समोर येत आहे.


एएसएल बैठकीनंतर एसपीजीद्वारे तयार करण्यात आलेल्या एएसएल रिपोर्चच्या 23 क्रमांकाच्या पानावर याचा उल्लेख करण्यात आला आहे. एएसएल बैठकीत एडीजीपी पंजाब पोलीस इन्चार्ज ऑफ सिक्युरिटी अरेंजमेंट, आयजी सीआयई पंजाब, आयजीपी लुधियाना रेंज, डीआयजी फिरोजपूर, डीसी फिरोजपूर, एसएसपी फिरोजपूरसह उतर अधिकारी देखील सहभागी होते.


रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, खराब वातावरणामुळे वीवीआयपी बठिंडा वायूसेना स्टेशन ते फिरोजपूर आणि परतीसाठी रस्त्याचा वापर करण्याची शक्यता आहे. वीवीआयपीसाठी निर्धारित  केलेले सर्व मार्ग सुरक्षित करण्याची आवश्यकता आहे. तसेच पर्यायी मार्ग देखील सुरक्षित ठेवावे. या अहवालातून स्पष्ट होते की, एएसएसला नियोजित दौऱ्याच्या दिवशी वातावरण खराब होण्याची शक्यता असल्याचा अंदाज होता.


वीवीआयपीचे आप्तकालीन मार्ग सुरक्षित करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या होत्या. एएसएसलच्या रिपोर्टमध्ये 24 क्रमांकाच्या पानावर याचा उल्लेख आहे.  यामध्ये मार्गावर काही गाव आहेत  त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीच्या नियंत्रणासाठी संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांना तैनात करण्यासंदर्भात सांगितले होते. त्यामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्यच्या दिवशी वातावरण खराब होण्याचा अंदाज होता. राज्य सरकार आणि पोलिस एएसएलने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात अपयशी ठरले आहेत. 



महत्वाच्या बातम्या