एक्स्प्लोर

Boris Johnson : लढाऊ विमाने तयार करण्यासाठी ब्रिटन करणार भारताला मदत : बोरिस जॉन्सन

Boris Johnson India Tour : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कालपासून भारत दौऱ्यावर आहेत.  आज ते  पंतप्रधान मोदी यांच्याशी दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत

Boris Johnson India Tour : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन कालपासून भारत दौऱ्यावर आहेत. जॉन्सन यांनी काल गुजरातमधून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यांनी काल अहमदाबादमध्ये उद्योजकांसोबत चर्चा केली. भारताची स्वतःची लढाऊ विमाने तयार करण्यासाठी ब्रिटन करणार भारताला मदत करणार असल्याबाबत सुतोवाच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे.  आज ते  पंतप्रधान मोदी यांच्याशी दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. ब्रिटन भारताला स्वत:ची लढाऊ विमाने कशी बनवायची आणि संरक्षण उपकरणांच्या जलद वितरणासाठी परवाना देणार असल्याची माहिती आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर याबाबत अजून जास्त स्पष्टता येईल. 
 
बोरिस जॉन्सन आज रशियाकडून अर्ध्याहून अधिक लष्करी उपकरणे खरेदी करणाऱ्या दक्षिण आशियाई देशांसोबत व्यापार आणि सुरक्षा संबंध वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहेत. जगाला निरंकुश राष्ट्रांकडून वाढत्या धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. जे लोकशाहीला कमजोर करू पाहत आहेत. मुक्त आणि निष्पक्ष व्यापार बंद करत ही राष्ट्रं सार्वभौमत्व पायदळी तुडवतात, असे जॉन्सन यांनी काल एका निवेदनात म्हटलं आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नवीन भारतीय-डिझाइन केलेल्या आणि तयार केलेल्या लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी पाठिंबा देण्यासाठी आणि विमाने बनवण्याबाबतचे सर्वोत्तम सुविधा देण्यावर आज चर्चा होणं अपेक्षित आहे.  

ब्रिटन संरक्षण वस्तूंच्या वितरणाची वेळ कमी करण्यासाठी भारताला तथाकथित मुक्त सामान्य निर्यात परवाना जारी करण्याची शक्यता आहे. माहितीनुसार सध्या फक्त युरोपियन युनियन आणि युनायटेड स्टेट्सकडे असा परवाना आहे.

हवामान बदलापासून ऊर्जा सुरक्षा आणि संरक्षण अशा विषयांवर आज पंतप्रधान मोदी आणि बोरिस जॉन्सन यांच्या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन यांच्यातील शेवटची भेट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्लासगो शिखर परिषदेदरम्यान झाली होती.

इतर महत्वाच्या बातम्या

Boris Johnson : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आजपासून भारत दौऱ्यावर; 'या' मुद्द्यांवर चर्चेची शक्यता

Russia Ukraine War : युक्रेनचा रशियाला दणका?  पूल उडवून रशियन सैन्याचा ताफा नष्ट केल्याचा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGovinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget