एक्स्प्लोर

गोव्यात बेकायदेशीर धर्मपरिवर्तन करणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरुंना अटक

गोव्यात बेकायदेशीर धर्मपरिवर्तन करणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरुंना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बेकायदेशीर धर्मपरिवर्तन होत असल्यास त्यावर कारवाई करण्याचं म्हटलं होतं. 

पणजी : राज्यात बेकायदेशीर धर्मपरिवर्तन करणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरुंना गोवा पोलिसांनी अटक केली. डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हास अशी अटक झालेल्या धर्मगुरुंची नावं आहेत. बेकायदा धर्मांतराच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी सडये शिवोली इथल्या फोर्थ पीलर चर्चच्या डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हास यांना अटक करण्यात आली. धर्मांमध्ये द्वेष पसरवण्याच्या कारणाखाली गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

म्हापसा पोलिसांनी गुरुवारी (26 मे) रात्री साडेआठच्या सुमारास कारवाई करत शिवली इथून डॉमनिक डिसोझा आणि जॉन मास्कारेन्हास यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांच्यावर कलम 153 अ, (धर्मावर आक्षेपार्ह किंवा हल्ले करणे) , 295 अ (धार्मिक भावना भडकावणे) तसंच औषधे आणि उपाय कायदा 1954 च्या कलम कलम 3 आणि 4 (आक्षेपार्ह जाहिराती) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

प्रकाश खोबरेकर नाव्याच्या व्यक्तीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, "डिसोझा आणि मस्कारेन्हास यांनी एका अज्ञात व्यक्तीला त्याचा धर्म सोडून धर्मांतर करण्यास प्रवृत्त केलं होतं." याशिवाय आरोपींनी जाणूनबुजून शब्द, कृतीतून धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने धमकावलं आणि त्यांनी सांगितलेला धर्म स्वीकारण्याचं आमिष दाखवल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

गोव्यात मागील अनेक वर्षांपासून डॉमनिक आणि जॉन बेकायदेशीररित्या धर्मपरिवर्तन करत असत. पैसे, औषधं आणि चांगलं खाणं-पिणं याचं आमिष दाखवून गरीब नागरिकांना धर्म बदलण्यास सांगत असत. आरोपींविरोधात याआधी अशाप्रकारचे आठ गुन्हे दाखल आहेत.

या दोघांचं यापूर्वी चर्चच्या कामकाजावरुन स्थानिक रहिवाशांसोबत वाद झाले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने इशारा देऊन त्यांना सोडलं होतं.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याआधीच धर्मपरिवर्तन यावर बंदीचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमादरम्यान राज्यात बेकायदेशीर धर्मपरिवर्तन होत असल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. 

Goa : गोव्यात उद्धवस्त मंदिरांची पुनर्बांधणी होणार, CM Pramod Sawant यांची मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्या

बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Abhijeet Dipke : राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget