एक्स्प्लोर

तात्काळ तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत सादर होणार

तात्काळ तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारं विधेयक आज (मंगळवार) राज्यसभेत सादर होणार आहे. लोकसभेत भाजपचं बहुमत असल्याने आणि एमआयएमसोडून इतर पक्षांनी या विधेयकाला बिनशर्त पाठिंबा दिल्याने, हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं.

नवी दिल्ली : तात्काळ तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारं विधेयक आज (मंगळवार) राज्यसभेत सादर होणार आहे. लोकसभेत भाजपचं बहुमत असल्याने आणि एमआयएमसोडून इतर पक्षांनी या विधेयकाला बिनशर्त पाठिंबा दिल्याने, हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं. पण राज्यसभेत भाजप आणि काँग्रेसची ताकद समसमान आहे. त्यामुळे आज हे विधेयक राज्यसभेत सादर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष काँग्रेसकडे असणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये या विधेयकावरुन चर्चा सुरु आहे. हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्या यावे, अशी मागणी डाव्या विचारांच्या पक्षांनी केली आहे. तर धर्मनिरपेक्ष आघाड्यांकडून या प्रकरणी काँग्रेसवर दबाव टाकला जात आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने आपल्या विचारधारेपासून फारकत घेतली असल्याची जोरदार चर्चा सध्या पक्षाअंतर्गत सुरु आहे. दुसरीकडे कम्यूनिस्ट पक्षाने या विधेयकाद्वारे भाजप राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. सीपीआयएमचे सचिव सीताराम येच्यूरी यांनी सांगितलं की, “आम्ही देखील तिहेरी तलाकच्या विरोधातच आहेत. आम्हालाही ही प्रथा बंद व्हावी असंच वाटतं. पण मुस्लीम समाजात लग्न हा एक आपसातला करार आहे. आणि नव्या विधेयकात यालाच गुन्हा मानलं गेलं आहे. जे पूर्णपणे चुकीचं आहे. भाजपने राजकीय फायदा मिळवण्यासाठी हे विधेयक आणले आहे. भाजप याद्वारे मतांचं ध्रुवीकरण करु पाहात आहे.” तर सीपीएमच्या पोलित ब्यूरोच्या सदस्या वृंदा करात यांनी सांगितलं की, “सरकार सुप्रीम कोर्टाच्या आदेशामार्फत त्या व्यवस्थेला गुन्हा ठरवू पाहात आहे, जी एक सिव्हिल डिस्प्युट आहे. जेव्हा सरकार महिला सशक्तिकरणाच्या नावावर हे सर्व करत होती, तेव्हा त्यांनी मुस्लीम महिला आणि त्यासंबंधी संघटनांकडून याबाबत माहिती घ्यायला पाहिजे होती.” तर सीपीआयचे डी.राजा यांनीही हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता या विधेयका संदर्भात काँग्रेस राज्यसभेत काय भूमिका घेईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. काँग्रेस पक्षाची भूमिकाच या विधेयकाचं भविष्य निश्चित करु शकते. कारण, हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झालं आहे. त्यातच सध्या मोदी सरकारच्या विरोधासाठी विरोधी पक्षांनी मोट बांधली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवरही या विधेकावरून दबाव वाढला आहे. राज्यसभेतील पक्षीय बलाबल भाजप : 57 काँग्रेस : 57 समाजवादी : 18 एआयएडीएमके : 13 तृणूमुल काँग्रेस : 12 बिजू जनता दल : 8 सीपीआयएम : 7 जेडीयू : 7 राष्ट्रवादी काँग्रेस : 5 बसपा : 5 डीएमके : 4 शिवसेना : 3 सीपीआय : 1

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Pandharpur Well Accicent: आंबे विहीर दुर्घटना, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध लागेना; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पंढरपूरच्या आंबे विहीर दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरूच; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडून संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Pakistan Economy : घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
घरात खायला दाणे नाहीत, पण स्वप्ने मात्र गगनभरारीची; 2050 पर्यंत पाकिस्तान जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था बनणार, पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या दाव्याने खळबळ
Pune Police : मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
मालकाने विश्वासाने सोपवलेली 28 लाखांची बॅग घेऊन कुरिअर बॉय पसार, पुणे पोलिसांचा फिल्मी स्टाईल तपास, तब्बल 10 हजार किमी पाठलाग करत मुसक्या आवळल्या
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, 33 सिनेमे आणि 15 हून अधिक संवादसत्रांची पर्वणी
‘चित्रपताका–2026’च्या दुसऱ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ!, आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
Embed widget