On This Day In History :  आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 24 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. यात महत्वाचं म्हणजे शेर-ओ-शायरीचा बादशाह अर्थात मिर्जा गालिब (Mirza Ghalib Birth Anniversary) यांची आज जयंती.  स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख (Panjabrao Deshmukh Birth Anniversary) यांचा जन्म देखील आजच्याच दिवशी झालेला. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan Birthday) याचा आज वाढदिवस. पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या (Benazir Bhutto Death)  आजच्याच दिवशी झालेली. यामुळं जगभरात खळबळ उडाली होती. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


1797 : शेर-ओ-शायरीचा बादशाह मिर्झा गालिब यांचा जन्म (Mirza Ghalib Birth Anniversary) 


शेर-ओ-शायरीचा बादशाह अर्थात मिर्जा गालिब यांची आज जयंती.   27 डिसेंबर 1797 रोजी आग्र्यातील काळा महालमध्ये गालिब यांचा जन्म झाला. तेव्हा भारतात मुघलांचे राज्य होते. मिर्जा असदुल्लाह बेग खान असे गालिब यांचे पूर्ण नाव. अत्यंत हालाखीच्या स्थितीत त्यांचं बालपण गेलं.  आर्थिक संकटांनी तर त्यांना बेजार केलं. मात्र जगण्यातले चटकेही त्यांनी शब्दबद्ध केले. शायरीतून व्यक्त केले. लहान असतानाच गालिब यांचं पितृछत्र हरपलं. त्यानंतर त्यांची काकांनी त्यांना सांभाळलं. मात्र त्यांचा आधारही त्यांना फार काळ मिळाला नाही. वयाच्या 13 व्या वर्षी उमराव बेगम यांच्या विवाह झाला आणि ते दिल्लीत आले. त्यानंतरचं संपूर्ण आयुष्य दिल्लीतच गेलं. मुघल काळातील शेवटचा सत्ताधारी बहादुर शाह जफर याच्या दरबारात कवी म्हणूनही ते राहिले. इश्क, मोहब्बत, वफा, लफ्ज... अशा असंख्य शब्दांमधून जगण्याचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या गालिब यांचं निधन वयाच्या 71 व्या वर्षी म्हणजे 15 फेब्रुवारी 1869 रोजी दिल्लीतील चांदनी चौक भागातील गली कासिम जानमध्ये झालं. आता या भागाला 'गालिब की हवेली' म्हटलं जातं.   


1822 : फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा जन्म  (louis pasteur birth anniversary)


लुई पाश्चर हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ते ओळखले जातात.   लुई पाश्चर यांच्या वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली. लुई पाश्चर यांना बॅक्टेरियोलॉजीच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि ते "मायक्रोबायोलॉजीचे जनक" म्हणून प्रसिद्ध आहेत


डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म (panjabrao deshmukh birth anniversary)


1898 : डॉ. पंजाबराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्वाचं नाव. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं.  विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते. अमरावतीतील पापळ या गावी त्यांचा जन्म झाला. उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले.1936 च्या निवडणुकीनंतर ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात  1000 च्या वर शाळा आहेत.  


जन गण मन पहिल्यांदा गायलं गेलं..( jan gan man)


1911 : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता (Indian National Congress) येथील अधिवेशनात 'जन गण मन' (jan gan man) हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर 24  जानेवारी 1950  रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.


आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना   (International Monetary Fund)


1945 : 29  देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund)ची स्थापना करण्यात आली. भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत. 'आयएमएफ'च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला प्रमुखपद देण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुखपद याआधी रघुराम राजन यांनीही भूषवलं आहे. 


1965: भाईजान सलमान खानचा जन्म  (Salman Khan Birthday)


Salman Khan Birthday : भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खान याच्या लोकप्रियतेविषयी नव्यानं काहीच सांगण्याची आवश्यकता नाही. मागील कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त  शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.  27 डिसेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खान आणि त्याच्या जवळचे मित्र पनवेल येथील फार्म हाऊसवर असल्याची माहिती आहे.  सलमान सध्या 'बिग बॉस' कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील करत आहे.  सलमान खानने 1988 साली बीवी हो तो ऐसी या हिंदी चित्रपटातील छोटेखानी भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.1989 साली सलमानाने प्रमुख नायकाची भूमिका साकारलेल्या मैने प्यार किया या हिंदी चित्रपटाने प्रचंड व्यावसायिक यश कमवले आणि त्याच्या करिअरला कलाटणी मिळाली. 


झारखंडच्या चासनाळातील खाणीत पाणी शिरलं अन् 372 कामगारांचा मृत्यू


1975 : बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरल्यानं मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 372  कामगार अवघ्या काही मिनिटांत ठार झाले.


2007 : पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या (Benazir Bhutto Death) 


बेनिझिर भुट्टो (Benazir Bhutto) या पाकिस्तानच्या दोन वेळा पंतप्रधान राहिल्या होत्या. त्यांना सातत्याने ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या. 27 डिसेंबर 2007 रोजी, रावळपिंडीत एका रॅलीमध्ये असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये भुट्टो यांचा मृत्यू झाला. बेनिझिर भुट्टो या पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. तसेच त्या झुल्फिकार अली भुट्टो यांच्या कन्या होत्या. बेनिझिर भुट्टो यांचे पती म्हणजे असिफ अली झरदारी यांनी भुट्टो यांचे शव विच्छेदन करु दिलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या हत्येचं गुढ कायम राहिलं आणि हल्लेखाराला शेवटपर्यंत पकडता आलं नाही. 


2013: प्रसिद्ध अभिनेते फारुख शेख यांचे निधन (Farukh Shaikh Death anniversary)


मुंबई : प्रसिद्ध अभिनेते फारुख शेख यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता. फारुख शेख यांचा जन्म 25 मार्च 1948 रोजी गुजरातमधील बडोद्यात झाला.1973 मध्ये त्यांनी ‘गर्म हवा’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यापूर्वी ते इप्टा या नाट्य संस्थेच्या माध्यमातून काम करत होते. हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर, त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘उमराव जान’, ‘चश्मेबद्दूर’, ‘नूरी’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘माया मेम साब’, ‘कथा’, ‘बाजार’ आदी सिनेमातून त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘उमराव जान’ या सिनेमाची कथा स्त्री व्यक्तीरेखेवर अधारित होती. पण फारुख शेख यांनी यात साकारलेली नवाब सुल्तानची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.  70 आणि 80 च्या दशकात त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत प्रमुख भूमिका साकारली आहे.