Indian Coast Guard Operation: गुजरातमध्ये पाकिस्तानी बोटीतून दारु गोळा, हत्यारांसह 300 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. इंडियन कोस्ट गार्ड (तटरक्षक दल) आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तरित्या आज कारवाई केली. 


गुजरातमध्ये इंडियन कोस्ट गार्ड आणि गुजरात पोलिसांनी एटीएसकडून मिळालेल्या माहितीची आधारावर पाकिस्तानी बोट ताब्यात घेतली. या बोटीमध्ये 10 पाकिस्तानी नागरिक होते.  बोटीच्या कॅप्टनसह दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याशिवाय आयसीजीने या बोटीमधू दारु गोळा, हत्यारांसह 40 किलो ड्रग्ज जप्त केलेय. या ड्रग्जची किंमत तब्बल 30 कोटी रुपये आहे. आयसीजीने सांगितलं की, गुजरात पोलीस आणि कोस्ट गार्ड जवानांनी ही कारवाई 25 आणि 26 डिसेंबर रोजी केली. 


आयसीजीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गुजरात एटीएसकडून पाकिस्तानमधून एक बोट भारतात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली होती.  त्यानंतर 25 आणि 26 डिसेंबर रोजी कोस्ट गार्ड आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तरित्या एक ऑपरेशन चालवलं. अरिंजय बोटीला पाकिस्तानला लागून असलेल्या भारतीय समुद्रात तैणात करण्यात आलं होतं. त्यानंतर मासेमारी करणाऱ्या सहेली नावाच्या पाकिस्तानी बोटीला ताब्यात घेतलं. त्या बोटीचा तपास केला असता त्यामुळे दारु गोळा, हत्यारे आणि 40 किलो ड्रग्ज आढळले. पाकिस्तानी बोटीसह सर्व सामान जप्त करण्यात आलेय. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत 300 कोटी रुपये आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या सुरु आहे. 






18 महिन्यात सातवी कारवाई -
भारतीय तटरक्षक दल, एटीएस आणि गुजरात पोलिसांच्या मदतीनं मागील काही दिवसांपासून समुद्र किनाऱ्यावरील हालचालीकडे विशेष लक्ष ठेवलं जात आहे. मागील 18 महिन्यात सातवी मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतात समुद्र मार्गे येणाऱ्या ड्रग्जसाठी विशेष अभियान राबवलं जातं आहे. पण पहिल्यांदाच ड्रग्सशिवाय दारु-गोळा आणि हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. अवैध्य पद्धतीनं याची तस्करी करण्यात येत असल्याचं समोर आले आहे. मागील 18 महिन्यात 44 पाकिस्तानी नागरिकांसह सात इराणी चालकांना अटक करण्यात आलेय. त्याशइवाय 1930 कोटी रुपये किंमतीचे 346 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलेय.