Ghazals of Mirza Ghalib Jagjit Singh: जेव्हा निरव शांततेत 'दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है...' मिर्झा गालिब यांची ही गजल जगजीत सिंह यांच्या आवाजात कानावर पडते, तेव्हा मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. ही फक्त या गजलेच्या बोलाची नाही, तर तिला एक सुंदर चाल लावून आपल्या आवाजातून घराघरात पोहोचवणाऱ्या जगजीत यांचीही कमाल आहे. जगत सिंह यांचा आवाज म्हणजे जादूच. त्यांनी साध्यातले साधे बोल असलेली गजलही आपल्या आवाजात गायली, तरी ती अनेक रसिक प्रेक्षकांच्या काळजाला भिडून जात होती. गजलेलाल कंटाळवाणा प्रकार मानणारा आज मोठा तरुण वर्ग गजल ऐकू लागला आहे. याचं मोठं श्रेय जगजीत सिंह यांना दिलं तर वावगं ठरणार नाही. आज म्हणजेच 10 ऑक्टोबर 2022 रोजी लोकप्रिय गझल गायक जगजीत सिंह यांना जगाचा निरोप घेऊन 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी गालिबला घराघरात पोहोचवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.  


जगजीत सिंह आणि प्रसिद्ध कवी, गीतकार गुलजार यांची मैत्री जगजाहीर आहे. गुलजार हे मिर्झा गालिब यांचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातली बरीच वर्षे गालिब यांचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. गुलजार यांनी 1988 साली मिर्झा गालिब यांच्या आयुष्यावर आधारित एक मालिकेची निमिर्ती केली होती. त्यावेळी गालिब यांच्या अतिशय कठीण उर्दू आणि पर्शियन गजला गाऊन गालिबला त्यांच्या निधनाच्या दोन शतकांनंतर जगभर घरोघरी पोहोचवण्याचं काम गुलजार आणि जगजीत सिंह यांनी केलं. या मालिकेत गालिब यांची मुख्य भूमिका नसीरुद्दीन शाह यांनी साकारली होती. या मालीकेच्या माध्यमातून उर्दू न जाणणाऱ्या नवीन पिढीला गालिब जगजित सिंह यांच्यामुळेच कळला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचला, असे म्हणायला हरकत नाही. 


जगजीत सिंह यांनी देशभरात आणि जगभरात गालिब यांच्या गजलांचे अनेक कार्यक्रम देखील केले. गालिब यांचं साहित्य घराघरात पोहोचावं म्हणून गुलजार आणि गालिब यांनी मिळून 'तेरा बयां गालिब' हा आणि असे अनेक  म्युझिक अल्बम देखील काढले. उर्दू कळत नसलेल्या लोकांनाही उर्दू गजलेची ओढ लावण्याचं काम फक्त जगजीत सिंह यांच्या सुरमयी आवाजामुळे होऊ शकलं.  


गालिब मालिकेतील जगजीत सिंह यांनी गायलेल्या गजल