कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभेतील विजयी घोडदौड टीएमसीने कामय ठेवली असून राज्यातील चार महापालिकांवर सत्ता मिळवली आहे. असनसोल, बिधाननगर, सिलिगुडी आणि चंदनागोर या चार महापालिकांवर टीएमसीने झेंडा फडकावला आहे. हा विजय मॉं, माटी आणि मानुषचा असल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.
असनसोल, बिधाननगर आणि चंदनागोर या महापालिकेवर टीएमसीने आपली सत्ता कायम ठेवली आहे तर सिलिगुडी या महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच त्यावर टीएमसीने झेंडा फडकावला आहे. बिधाननगर महापालिकेत टीएमसीने 41 पैकी 39 जागांवर विजय मिळवला आहे. तर चंदनागोर महापालिकेत 32 पैकी 31 जागावर कब्जा मिळवला आहे. असनसोल महापालिकेमध्ये 106 जागांपैकी टीएमसीने 91 तर भाजपने सात जागा मिळवल्या आहेत.
सिलिगुडी महापालिका तिच्या स्थापनेपासून डाव्या पक्षांचा गड होता. या पालिकेवरही टीएमसीने कब्जा मिळवला आहे. या महापालिकेत टीएमसीने 37 जागा मिळवल्या आहेत तर भाजपने पाच जागा मिळवल्या आहेत.
टीएमसी गोवा विधानसभेची निवडणूक लढवत आहे. आपण दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन उत्तर प्रदेशची निवडणूक लढवत नसल्याचं पश्चिम बंगाचल्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: