Trending Video: सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडिओला मोठी पसंती दर्शवली जाते. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती चक्क त्याला हुंड्यात ट्रेन मिळणार असल्याचं सांगत आहे. या व्हिडिओवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओपैकी कॉमेडी व्हिडिओला जास्त पसंती दर्शवली जाते. हे व्हिडिओ प्रचंड वेगानं सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्याला हुंड्यात ट्रेन मिळणार होती, असं सांगताना दिसत आहे. परंतु, त्यानं सासरकडच्या मंडळींना नकार दिलाय. याचं कारण ऐकूण सर्वजण पोट धरून हसत आहेत. 


व्हिडिओत संबंधित व्यक्ती म्हणतोय की, त्याच्या सासरच्या मंडळांनी त्याला हुंड्यात ट्रेन देतो असं म्हटलं. ही गोष्ट खरी असल्याचंही तो म्हणत आहे. परंतु, त्यानं नकार दिला. नकार देण्यामागचं कारण त्याला विचारलं असता तो म्हणाला की, मला ट्रेन चालवता येत नाही. यामुळं मी नकार दिला. याशिवाय, घरी ट्रेन उभी करण्यासाठी जागा नसल्याचंही त्यानं म्हटलंय. यामुळं त्याला नकार द्यावा लागलाय, असंही त्यानं म्हटलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सही पोट धरून हसत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 60 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 


या व्हिडिओवर युजर्सनं मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तू फेक आम्ही झेलतो... मलाही हुंड्यात रॉकटे मिळणार होतं, पण बाईकवर फिरण्याची मजा काही वेगळीच आहे, अशी प्रतिक्रिया युजर्सकडून देण्यात आलीय. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha