Mamta Banarji Blocks Jagdeep Dhankhar: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकारमध्ये सत्तास्थानी असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील मोदी सरकारचा संघर्ष काही नवा नाही. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात सतत काही ना काही कारणांवरून मतभेद पाहायला मिळालंय. याचपार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी जगदीप धनखड यांना ट्वीटरवर ब्लॉक केलंय. याबाबत स्वत: ममता बॅनर्जीनी प्रसारमाध्यमांना माहिती दिलीय. यामागचं कारणही त्यांनी सांगितलंय. 


ममता बॅनर्जींनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, " “मी एका गोष्टीसाठी आधीच माफी मागते. राज्यपाल दररोज काहीतरी ट्वीट करून मला किंवा माझ्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत असतात. ते असंवैधानिक आणि अनैतिक वक्तव्य करतात. ते सल्ला न देण्याचे निर्देश देतात. लोकनियुक्त सरकार वेठबिगार कामगार झालीय. मला याचा राग येतो. त्यामुळे मी राज्यपालांना ट्विटरवर ब्लॉक केलंय”


पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल धनखड आणि मुख्यमंत्री ममता यांच्यात सतत खटके उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. केंद्र विरुद्ध राज्य संघर्षाचीही याला पार्श्वभूमी आहे. त्यात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला राज्यपाल धनखड यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राज्य सरकारला लक्ष्य केल्याने वादाची नवी ठिणगी पडली. 


धनखड काय म्हणाले होते?
महात्मा गांधी पुण्यतिथीच्या दिवशी धनखड यांनी बंगाल सरकावर सडकून टीका केली होती. “मी बंगालच्या पवित्र भूमिला हिंसेमुळे रक्ताने माखलेलं पाहू शकत नाही. मानवाधिकारांचा चिरडण्यासाठी बंगाल एक प्रयोगशाळा बनत आहे. हे राज्य लोकशाहीसाठी गॅस चेंबर होत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha