एक्स्प्लोर

ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका : उद्धव ठाकरे

युतीबाबत अनिश्चितता असल्याने शिवसेनेच्या खासदारांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता पसरल्याचं म्हटलं जात आहे.

नवी दिल्ली : "ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका," असे स्पष्ट आणि खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना सुनावले आहेत. 'मातोश्री'वर बोलावून या खासदारांची कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीची शक्यता पूर्ण मावळल्याचे संकेत शिवसेना नेतृत्त्वाकडून मिळाले आहेत. युतीबाबत अनिश्चितता असल्याने शिवसेनेच्या खासदारांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता पसरल्याचं म्हटलं जात आहे. भाजपसोबत युती झाली नाही तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेची परिस्थिती केविलवाणी होऊ शकते, असं अनेक शिवसेना खासदारांचं मत आहे. यामुळे शिवसेना खासदारांमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थतता असल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही, तर युती केली नाही तर आम्ही लढणार नाही, असं किमान पाच खासदारांनी सांगितल्याचंही बोललं जात आहे. ही बातमी प्रसारित झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी या अस्वस्थ खासदारांना 'मातोश्री' या निवासस्थानी बोलावून कानउघाडणी केली. भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका, असंही त्यांनी सुनावलं. शिवसेना खासदारांमध्ये अस्वस्थता 2014 च्या मोदी लाटेचा फायदा त्यावेळी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही झाला. लाखोंच्या फरकाने जिंकत शिवसेनेचे 18 खासदार लोकसभेत पोहचले. मात्र गेल्या साडेचार वर्षात युतीच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. यावेळी युती झाली नाही तर भाजपचं जे व्हायचं ते होईल, पण शिवसेनेला दुहेरी आकडाही गाठता येणार नाही असं अनेक शिवसेना खासदारांचं मत आहे. अर्थाच या मतांना निर्णयप्रक्रियेत फारसं महत्व नसल्याने सर्वच खासदार ह्या विषयामुळे अस्वस्थ आहेत. युती न झाल्यास लढणार नाही, शिवसेनेचे पाच खासदार अस्वस्थ शिरुरचे खासदार आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली याच भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवण्याचा निर्णय सेना खासदारांनी घेतला. तो अमंलातही आणल्याची चर्चा आहे. भाजपसोबत युती झाली नाही तर आपापल्या भागातली समीकरणे कशी बदलतात, त्याचा कसा आणि किती फटका बसणार हे शिवसेना पक्षप्रमुखांना कळवण्यात आल्याचं समजतं. शिवसेनेचे अनेक विद्यमान खासदार हे आजच्या खर्चिक निवडणुकीत हरण्यासाठी पैसा लावायला तयार नाहीत. भाजपशिवाय लढल्यास शिवसेनेला चार ते पाच जागाच मिळतील, असं भाजपचं अंतर्गत सर्वेक्षण सांगतं, तर शिवसेनेच्या अंतर्गत सर्व्हेनुसार युती झाली नाही तर 7 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. स्वतंत्र लढल्यास सेना-भाजप या दोन्ही पक्षांना लोकसभेत मोठ्या मुश्किलीने 15 जागा मिळू शकतात. अशा वेळी स्वतःचं नाक कापून घ्यायचं, की मानापमान विसरुन एकत्र लढायचं याचा विचार शिवसेनेला करावा लागणार आहे. शिवसेना-भाजप युतीमागचा खरा वाद हा जागांचा नाही. कारण आहे भाजपकडून शिवसेनेला सन्मानाची वागणूक न मिळाल्यामुळे ठेचलेल्या स्वाभिमानाचं. मोठा भाऊ गेल्या निवडणुकीत छोटा झाला याचं. परंतु आता उद्धव ठाकरे यांच्या तंबीमुळे भाजप-शिवसेना युती मावळल्याचे संकेत मिळत आहेत. पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget