नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया सोडणार असल्याचं ट्वीट केलं होतं. त्यावरून संपूर्ण देशासह जगभरात चर्चांधा उधाण आलं होतं. परंतु, मोदी कोणतंही सोशल मीडिया अकाउंट बंद करणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. रविवारी 8 मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने पीएम मोदी ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम महिला चालवणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, मी अशा महिलांना सोशल मीडिया वापरायला देणार आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते.'
पंतप्रधान मोदींनी काय ट्वीट केलं आहे?
पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे की, 'या महिला दिवसाच्या निमित्ताने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सची कमान त्या महिलांच्या हाती देणार आहे, ज्यांनी आपल्या आयुष्याने आणि कामाने आपल्याला प्रेरित केलं आहे. यामुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळणार आहे. तुमची कहानी अशी आहे का? तुम्ही अशा महिलांना ओळखता का? #SheInspiresUs हा हॅशठॅग वापरून अशा महिलांची कहाणी शेअर करा.'
पंतप्रधान मोदींनी कालं केलं होतं ट्वीट
मोदींनी काल एक ट्वीट केलं होतं, त्यामध्ये ते म्हणाले होते की, 'मी या येत्या रविवारी माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्यूब या सर्व सोशल मीडियावरून निघून जाण्याचा विचार करत आहे, तुम्हाला याबद्दल माहिती देत राहीन' परंतु, आता पंतप्रधान मोदींनीच सस्पेन्सवरून पडदा उचलला आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी काल केलेल्या ट्वीटनंतर विरोधकांनी मोदींवर हल्लाबोल केला होता. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे. पंतप्रधान मोदीजी द्वेष सोडा, सोशल मीडिया नको, असा सल्ला राहुल गांधी यांनी मोदी यांना दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या मनात द्वेष आहे, अशी टीका अनेक वेळा राहुल गांधी यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
नरेंद्र मोदींचे सोशल मीडिया सोडण्याचे संकेत, येत्या रविवारी मोठा निर्णय घेणार
जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्चर्यकारक निर्णय
मुख्यमंत्री ते पंतप्रधान... मोदींचा अकरा वर्षांचा ट्विटर प्रवास!