नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर त्यांचे लाखो फॉलोअर्स अनाथ होतील, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठी घोषणा करणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा विचार करत आहे. या विषयीची माहिती पंतप्रधान मोदी यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून दिली आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे. तसेच मोदी नक्की कोणती घोषणा करण्याच्या तयारीत आहेत? यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच मोदींच्या ट्वीटबाबत संजय राऊत यांना विचारलं असता, त्यांनी खोचक टोला हाणला आहे.


संजय राऊत बोलताना म्हणाले की, 'सोशल मीडियावर नेहमी युद्ध होत असतात. नरेंद्र मोदींना देशभरात आणि जगभरात कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. जर नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाचा त्याग केला तर त्यांचे फॉलोअर्स अनाथ होतील. त्यांना अनाथ करणं ठिक नाही. हे त्यांचे सायबर योद्धा आहेत, योद्धा सेनापतीच्या आदेशानुसार काम करतात. सेनापतीच सोशल मीडियाचं मैदान सोडणार असतील तर फौज काय करेल? मी ऐकलं आहे आणि वाचलंही आहे की, अमित शहा म्हणाले होते, सायबर योद्धा मैदानात उतरतात, त्यावेळी भाजप निवडणूका जिंकतं. सोयबर योद्ध्यांचं काम काय? हे सर्वांना माहित आहे. पण सोशल मीडियचा गैरवापरही होत आहे. आपल्या देशात राजनितीक, सामाजिक, दंगली भडरकवण्यासाठी , अफवा पसरवण्यासाठी, खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी, लोकांना भ्रमित करण्यासाठी वापर होतो. म्हणूनच त्याविरोधात कायदा करण्याची वेळ आली आहे.'


शिवसेना खासदार संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, 'नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांशी थेट संवाद साधतात. अशाप्रकराचा निर्णय मोदींनी का घेतला हे मला माहित नाही. त्यांची मन की बात सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी मी ऐकतो. अनेकदा तर चांगल्या गोष्टी असतात, कधी राजकीय गोष्टिही असतात. पण तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु मी एवढचं म्हणेल की, त्यांच्या या निर्णयामुळ अनेक लोक अनाथ झाले आहेत.


दिल्ली हिंसाचाराबाबत काँग्रेस अमित शहांनी राजीनामा द्यावा ही मागणी करत आहे. त्याबाबत विचारल्यावर संजय राऊत म्हणाले की, 'दिल्लीमधील हिंसाचार अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यासाठी गृहमंत्री जबाबदार असतात. जर एखादी गंभूर गोष्ट घडत असेल तर विरोधकांचा हक्क असतो की, सरकारक प्रश्न विचारणं. गृहमंत्री असो वा पंतप्रधान त्यांना सभागृहात येऊन उत्तर द्यावं लागेल. दिल्लीत बॉम्बस्फोट झाले होते त्यावेळी शिवराज पाटील गृहमंत्री होते. त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'सर्वात आधी दिल्ली हिंसाचाराची जबाबदारी कोणाची हे ठरवावं लागले. परंतु, अनेकदा सत्ताधारी कोणत्याच बाबतीत जबाबदारी स्विकारत नाही. हा विरोधकांचा डाव असल्याचं सांगून ते जबाबदारी झटकतात. तेच यावेळीही होतं आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन याबाबत एक निर्णय घेणं आवश्यक आहे.'


संबंधित बातम्या : 


सोशल मीडियावर मोदींचे फॉलोअर्स कोटींच्या घरात; 2019मधील 'ते' ट्वीट 'गोल्डन ट्वीट'


नरेंद्र मोदींचे सोशल मीडिया सोडण्याचे संकेत, येत्या रविवारी मोठा निर्णय घेणार


जाणून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्चर्यकारक निर्णय