नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया सोडण्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियामध्ये खळबळ माजली आहे. परंतु असे आश्चर्यकारक निर्णय घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली वेळ नाहीय या अगोदरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आश्चर्यकारक निर्णय घेतले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे संपूर्ण देश हादरला होता. 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता त्यांनी अचानक 500 आणि 1000 च्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली तेव्हा त्यांनी आपल्या या निर्णयामुळे लोकांना आश्चर्यचकित केले. पंतप्रधान मोदींनी स्वत: देशाला संबोधित करताना ही मोठी घोषणा केली होती.



याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा अचानक पाकिस्तानचे पंतप्रधान नरेंद्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेऊव लोकांना चकित केले होते. वास्तविक पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानातून भारतात परत येत होते. परंत येत असताना ते थेट लाहोरमध्ये गेले आणि तेथे नवाज शरीफ यांची भेट घेतली. नवाज शरीफ यांच्यासह सुमारे एक तास त्यांनी चर्चा केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक हुनर हाट येथील एक फोटो शेअर केला. जो फोटो सोशल मीडिया व्हायरल झाला होता. हुनर हाट मधील एका दुकानात त्यांनी लिट्टी चोखा खाल्ल्याचा हा फोटो होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवर काही व्हिडिओं व्यतिरिक्त त्यांनी लिट्टी चोखा खाण्याचे फोटोही शेअर केले होते.



काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, 'मी या येत्या रविवारी माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्यूब या सर्व सोशल मीडियावरून निघून जाण्याचा विचार करत आहे, तुम्हाला याबद्दल माहिती देत राहीन'