नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठी घोषणा करणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा विचार करत आहे. या विषयीची माहिती पंतप्रधान मोदी यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून दिली आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, 'मी या येत्या रविवारी माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि युट्यूब या सर्व सोशल मीडियावरून निघून जाण्याचा विचार करत आहे, तुम्हाला याबद्दल माहिती देत राहीन'
कदाचीत ते समाज माध्यामाच्या जगातून कायमचा रामराम ठोकण्याच्या विचारात असल्याचे या ट्वीटवरून दिसत आहे. ट्वीटरवर सर्वाधिक फॉलो करणाऱ्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे राजकीय नेते आहे. ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे 53.3 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी फेसबुकवर चार करोड 47 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहेत. याशिवाय इन्स्टाग्रामवर त्याचे 35.2 मिलीयन फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान मोदींचे युट्यूबवर साडेचार मिलीयन सबस्क्रायबर आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या विषयी अनेक प्रतिक्रिया येत आहे. राहुल गांधी यांनी देखील नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट शेअर करत राहुल गांधी म्हणाले, द्वेष सोडा, सोशल मीडिया नाही.
कॉंग्रेस नेते अधीर रंजन म्हणाले, सोशल मीडिया सोडण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: डिजीटल इंडियाचे स्वप्न बघत आहेतर ते सोशल मीडियावरून दूर जाण्याचा विचार देखील कसे करत आहे.
मोदी यांच्या ट्वीटनंतर ्#No Sir, #narendramodi, #Modiji, #pleasesir ट्रेण्ड होत आहे.