Modi Became Emotional: मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या पहिल्याच 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा'ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी हे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, बऱ्याच वर्षांनी असं पहिल्यांदा होणार, जेव्हा रक्षाबंधनाला दीदी नसणार, असं बोलताना मोदी भावूक झाले होते.  

यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, मी सहसा कोणते पुरस्कार घेत नाही, पण जर पुरस्कार लतादीदींच्या नावानं आणि मंगेशकर कुटुंबियांकडून असेल तर इथे येणं माझं कर्तव्य आहे. मी लतादीदींच्या नावानं मिळालेला हा पुरस्कार सर्व देशवासियांना समर्पित करतो. जशी लता दीदी लोकांची होती. त्याचप्रमाणे त्यांच्या नावाने मला दिलेला हा पुरस्कार ही जनतेचा आहे. लतादीदींच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराला नकार देणं, मला शक्य नव्हते. मी लगेचच पुरस्कारासाठी होकार दिला.


पंतप्रधान मोदी म्हणाले, ''लतादीदींशी माझं नेहमीच बोलणं होत होतं. मी त्यांच्याबद्दल एक गोष्ट विसरू शकत नाही. त्या नेहमी म्हणायच्या की, माणूस त्याच्या कामाने मोठा होतो, वयाने नाही. देशासाठी जो जितकं काम करतो, तो तितका मोठा होतो. लतादीदी वयानेच नाही तर कर्मानेही मोठ्या होत्या.''  


पंतप्रधान मोदी म्हणाले की, लतादीदींना लोक सरस्वतीचं प्रतीक मानतात. जवळपास 80 वर्षे त्यांनी संगीत जगतात आपली छाप सोडली. मोदी म्हणाले की, संगीताचा आपल्या हृदयावर परिणाम होतो. ते म्हणाले की, लतादीदींची देह यात्रा अशा वेळी पूर्ण झाली जेव्हा देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. लता दीदींच्या वडिलांचे नावही या पुरस्काराशी जोडले गेले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मंगेशकर परिवाराचे आपण सर्व ऋणी आहोत. संगीतासोबतच लतादीदींमध्ये देशप्रेमाची भावनाही होती. ही प्रेरणा त्यांना त्यांचे वडील दीनानाथ यांच्याकडून मिळाली.


महत्वाच्या बातम्या :