Devendra Fadnavis : पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' (Lata Mangeshkar Award) पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत लिहिले आहे, "माननीय पंतप्रधानांचे अभिनंदन. देशाप्रती असलेले नरेंद्र मोदींचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरल्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन. लता दीदींच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी दिला जाणार आहे. हा पुरस्कार माननीय पंतप्रधान मोदीजींना मुंबईत प्रदान करण्यात येणार आहे, ही आनंदाची बाब आहे".
पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पुरस्काराने 24 एप्रिलला मुंबईत सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उषा मंगेशकर यांच्या हस्ते 'लता दिनानाथ मंगेशकर' हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. मनोरंजन, क्रीडा, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या