Lata Mangeshkar : माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे, असं नेहमी लता दीदी मला म्हणायची. आता पाया कोणाच्या पडायच्या, अडचणी कोणाला सांगायच्या, असा प्रश्न पडला आहे, अशा शब्दांत आशा भोसलेंनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान या आठवणी सांगताना आशा भोसलेंचा कंठदेखील दाटून आला.
6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या फोटोचं अनावरण विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पार पडले.
फोटोचं अनावरण करताना पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते. अनावरणानंतर 'आनंदघन' हा लतादीदींना सांगीतिक आदरांजली वाहणारा कार्यक्रम पं. हृदयनाथ मंगेशकर आणि अन्य कलाकारांनी सादर केला.
दीदींचा स्वर मी वर्णन करू शकत नाही; विक्रम गोखले
विक्रम गोखले म्हणाले, दिदींच्या तैल चित्राचे अनावरण माझ्या हस्ते झाले याचा मी ऋणी आहे. दिदींना दीना आबांचा आशीर्वाद मिळाला होता. दिदींचा आशीर्वाद सर्व भावडांवर आहे. त्यामुळेच ते आपापल्या स्थानी व्यवस्थित काम करत आहेत. दीदींचा स्वर मी वर्णन करू शकत नाही. आम्ही सर्व मंगेशकर कुटुंबियांच्या ऋणात आहोत.
वडिलांच्या फोटोबरोबर लता दीदीचा फोटो लागेल पाहवत नाही; पंडीत हृदयनाथ मंगेशकर
पंडीत हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, लता दीदी गेली यावर माझा विश्वास बसत नाही. आज दीनानाथ नाट्यगृहात लता दीदीचा फोटो लागला. उद्या आणखी चार नाट्यगृहात तिचा फोटो लागेल. वडिलांच्या फोटोबरोबर लता दीदीचा फोटो लागेल हे पटत नाही.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar : दीदी पंतप्रधान झाली असती, असं म्हणत आशा भोसलेंना अश्रू अनावर
Oscars 2022 : ‘ऑस्कर’ला लता मंगेशकर आणि दिलीपकुमारांचा पडला विसर? संतप्त चाहते म्हणतात...
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ला मिळणार होता गानकोकीळा लतादीदींचा आवाज, पण..., विवेक अग्निहोत्रीने केला खुलासा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha