BARC Recruitment 2022 : भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांनी स्टायपेंडरी ट्रेनी, वैज्ञानिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत, स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-I, स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-II, वैज्ञानिक सहाय्यक (सुरक्षा), तंत्रज्ञ (ग्रंथालय विज्ञान) आणि तंत्रज्ञ (रिगर) या पदांची भरती केली जाईल.


या भरतीच्या माध्यमातून 266 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-I च्या 71 पदं (UR-27, EWS-8, OBC- 18, SC-10, ST-7 आणि PWD-1) आणि स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-2 च्या एकूण 189 पदांची भरती केली जाईल, यामध्ये UR साठी 118 पदं, EWS साठी 14, OBC साठी 33, SC साठी 23 आणि PWD साठी 1 पद निश्चित करण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या तारखा : 


ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 01 एप्रिल 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2022


या भरतीच्या स्टायपेंडियरी ट्रेनी श्रेणी-1 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित अभियांत्रिकीचा डिप्लोमा, स्टायपेंडियरी ट्रेनी श्रेणी-II साठी उमेदवार 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि A/c मेकॅनिकच्या ट्रेडमधील प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.


या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट https://nrbapply.formflix.com ला भेट देऊ शकतात. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना सूचित केलं जातं की, त्यांनी वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. दरम्यान, एका पदासाठी फक्त एकच अर्ज वैध असेल आणि जर एखाद्या उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी अर्ज आणि शुल्क स्वतंत्रपणे भरावं लागेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :