नवी दिल्ली: बंगळुरु हे भारतातील राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट शहर असल्याचं केंद्र सरकारच्या 'इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स' मध्ये सांगण्यात आलंय. या यादीमध्ये पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सुरत, नवी मुंबई, कोईम्बतूर, वडोदरा, इंदोर आणि ग्रेटर मुंबई असा क्रम लागतो.


केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 'इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स' मध्ये दहा लाखांच्या वरती लोकसंख्या असलेल्या 49 शहराची यादी देण्यात आली आहे. ही शहरं नागरिकांना चांगलं जीवन जगण्यास योग्य असल्याचं सांगण्यात आलंय. या यादीत दिल्लीचा 13 वा क्रमांक लागतोय.





OPEC चा कच्च्या तेलाचे उत्पादन न वाढवण्याचा निर्णय, इंधनाच्या किंमती वाढणार?


हा इन्डेक्स केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाकडून जाहीर केला जातो. दहा लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये शिमला या शहराने अव्वल क्रमांक पटकवला आहे. या कॅटेगरीमध्ये भूवनेश्वर या शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर अनुक्रमे सिल्व्हासा, काकिनाडा, सेलम, वेल्लोर, गांधीनंगर, गुरुग्राम या शहरांचा क्रमांक लागतोय. मुझफ्फरपूर या शहराचा शेवटचा क्रमांक लागतोय.


'मुन्सिपल परफॉर्मन्स इन्डेक्स' मध्ये नवी दिल्ली महापालिकेने अव्व्ल क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर तिरुपती, गांधीनगर, कर्नाल, सेलम, तिरुप्पूर, बिलासपूर, उदयपूर, झांशी या शहरांचा क्रमांक लागतोय.


शहरातील जुन्या वास्तूंचा खासगीकरणातून विकास करण्याचा पुणे महानगरपालिकेचा निर्णय