Rahul Gandhi On Pappu: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जवळपास सर्वच पक्षाचे राजकीय नेते आणि समर्थक 'पप्पू' म्हणतात. राहुल गांधींना कित्येकदा 'पप्पू' म्हणत, सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. यावरच राहुल गांधींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला या नावासंदर्भात काहीच अडचण नाही. पूर्वी माझ्या आजीला (इंदिरा गांधी) (Indira Gandhi) सुद्धा गुंगी गुडिया (Gungi Gudiyaan) म्हटलं जायचं आणि आज त्यांनाच आयर्न लेडी (Iron lady of india) म्हणून ओळखलं जातं. 


'द बॉम्बे जर्नी'ला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी (Rahul Gandhi News) म्हणाले की, "राजकारणात एकमेकांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारणं हा प्रचाराचा भाग आहे. आज जे मला पप्पू म्हणतात ते खरं तर मला आतून घाबरतात. ते नाराज आहेत. मला कोणत्याही नावानं हाक मारायला हरकत नाही. मी त्या नावाचं स्वागतच करिन."


या त्याच व्यक्ती ज्या 24 तास मला... 


राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, "माझी आजी (इंदिरा गांधी) यांना राजकीय वर्तुळात गूंगी गुडिया (Gungi Gudiyaan) म्हणून हिणवलं जायचं. पण आता त्यांना आयर्न लेडी (Iron lady) म्हणून संबोधलं जातं." पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "हे तेच लोक आहेत, जे मला आज 24 तास, सातही दिवस पप्पू म्हणून हिणवतात. मला या नावानं काहीच अडचण नाही."


3 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार 'भारत जोडो यात्रा' 


राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) 24 डिसेंबरला दिल्लीत पोहोचली होती. त्यानंतर आता सध्या यात्रेत 9 दिवसांचा ब्रेक आहे. तर, 3 जानेवारीला ती पुन्हा कश्मिरी गेटपासून सुरू होईल आणि प्रवास पूर्ण करेल. जम्मू-काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तीही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. 


तवांगच्या मुद्द्यावर राहुल गांधींचं वादग्रस्त वक्तव्य 


अलिकडच्या काही दिवसांत राहुल गांधी तवांग मुद्द्यावरून केलेल्या एका वक्तव्यामुळे वादात भोवऱ्यात सापडले आहेत. भारतीय जवानांना मारहाण झाल्याची टिप्पणी त्यांनी केली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्याचा संसदेत सत्ताधाऱ्यांनी निषेध केला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Indian National Congress : काँग्रेसचा आज 138 वा स्थापना दिवस, कशी आहे आत्तापर्यंतची वाटचाल; वाचा सविस्तर...