Terrorist Encounter In Jammu: जम्मू काश्मीरमधील सिधरा परिसरात सैन्याची आतंकवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत तिन्ही आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. ट्रकमधून श्रीगरला जात असताना लष्कराकडून आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
ट्रकमधून श्रीगरला जात असताना लष्कराकडून आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत लष्कर ए तोयबा (LET) च्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सैन्याची आतंकवाद्यांसोबत चकमक सिधरा परिसरात झाली.
काश्मिर पोलीसांनी या पूर्ण ऑपरेशनची माहिती दिली आहे. तीन स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन दहशतवाद्यांच्या ओळख पटवण्यात यश मिळाले आहे. तर तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कंठस्थान घातलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी शोपियाचा लतीफ लोन आहे. हा काश्मिरी पंडित पुराण कृष्ण भटच्या हत्येत सहभागी होता. तर दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव उमर नजीर आहे. अमर नेपाळच्या तिल बहादुर थापाच्या हत्येत सहभागी होत. दहशतवाद्यांकडे एक Ak-47 रायफल आणि पिस्टल जप्त आढळले आहे.
सुरक्षा दलांना मोठे यश, दहशतवाद्यांचा खात्मा
सप्टेंबर महिन्यात काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत 2 घुसखोर आणि 14 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. त्यात एक पाकिस्तानी दहशतवादीही होता. यापैकी दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बास्कुचन आणि चित्रगाम गावात झालेल्या दोन चकमकीत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमध्ये 3, अनंतनाग आणि कुलगाममध्ये प्रत्येकी 2 आणि श्रीनगर, बारामुल्ला आणि कुपवाडा येथे प्रत्येकी एक चकमक झाली. कुपवाड्यात दोन दहशतवादी मारले गेले.
शोपियातील दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांच्यावर गोळीबार
15 ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांवर देखील हल्ला केला. शोपियातील दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांच्यावर गोळीबार करत हत्या केली. त्यानंतर दहशतवादी फरार झाले. जम्मू काश्मिरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरण कृष्ण भट्ट यांच्या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर या दहशतवादी संघटनेने घेतली. काश्मिरमध्ये घडणाऱ्या या घटनांमुळं काश्मिरी पंडितांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.