CBSE Board Exam 2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (CBSE) शैक्षणिक सत्र 2022-23 साठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बोर्ड 02 जानेवारी ते 14 जानेवारी 2023 दरम्यान इयत्ता दहावी (CBSE 10th Exams) आणि बारावीसाठी (CBSE 12th Exams) प्रॅक्टिकल परीक्षा (Practical Exams) घेणार आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा वेळेवर पूर्ण करण्याचं आवाहन बोर्डानं शाळांना केलं आहे. बोर्डानं प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (SoP) आणि मार्गदर्शक तत्त्वं देखील जारी केली आहेत.


02 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीतील विद्यार्थ्यांचे गुण/इंटरनल ग्रेड अपलोड करण्याचे निर्देश बोर्डानं शाळांना दिले आहेत. विद्यार्थी प्रॅक्टिकल परीक्षा/प्रोजेक्ट असेसमेंट/अंतर्गत मुल्यांकनामध्ये बसू शकतात. जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, 'सर्व विद्यार्थ्यांना सूचना द्या की, त्यांना दिलेल्या वेळापत्रकातच प्रॅक्टिकल परीक्षा द्यावा लागतील. परीक्षेच्या दिवशी कोणत्याही कारणानं गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा निश्चित तारखांमध्ये पुन्हा घेतली जाईल.


प्रॅक्टिकल परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास निकालात विद्यार्थी गैरहजर असल्याचं नोंदवण्यात यावं आणि एखाद्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिकल परीक्षा इतर कोणत्याही तारखेला घेतली जाणार असेल तर त्याची 'अनुपस्थित' ऐवजी 'रीशेड्यूल' अशी नोंद केली जावी, असंही बोर्डानं म्हटलं आहे. शाळेला निश्चित वेळापत्रकातच रीशेड्यूल म्हणून चिन्हांकित केलेल्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची परवानगी दिली जाईल.


CBSE ची परीक्षा दोन टर्ममध्ये नाहीतर, एकाच वेळी 


गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसं होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टर्मच्या परीक्षेचं आयोजन गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये करण्यात आलं होतं. तर टर्म-2 ची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू झाली होती. यावर्षी सीबीएसईनं 22 जुलै रोजी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला. इयत्ता बारावी मध्ये एकूण 92.71 टक्के तर दहावी मध्ये 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.


यंदा 15 फेब्रुवारीपासून दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा 


दरम्यान, सध्या देशासह जगात कोरोना प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना प्रादुर्भावात झालेली घट लक्षात घेता,  CBSE ने 15 फेब्रुवारी 2023 पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे, यंदा परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे. 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI