नवी दिल्ली : कोलकाता डॉक्टर तरुणीच्या बलात्कार हत्या प्रकरणानंतर (Kolkata doctor rape-murder case) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) संपावर असलेल्या डॉक्टरांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्यावर कोणतीही प्रतिकूल कारवाई केली जाणार नाही असे आश्वासन दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरच्या कथित बलात्कार आणि हत्येशी संबंधित प्रकरणांची सुनावणी पुन्हा सुरू केली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सीबीआय आणि कोलकाता पोलिसांनी दाखल केलेल्या चौकशीच्या स्थिती अहवालाची तपासणी केली.


सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?


मंगळवारी या प्रकरणाच्या (Kolkata doctor rape-murder case) सुनावणीदरम्यान, या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतल्यानंतर,सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील एससी खंडपीठाने पश्चिम बंगाल सरकारवर ताशेरे ओढले आणि राज्य पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली. संस्थेचे माजी प्राचार्य संदिपकुमार घोष यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.हत्या ही आत्महत्या म्हणून पुढे जाण्याचा प्रयत्न होता, असेही खंडपीठाने म्हटले आहे. 


सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. कोलकाता पोलिसांकडून तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयने गुन्ह्याचे थ्रीडी स्कॅनिंग, कागदपत्रे आणि व्हिडिओ फुटेजसह सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहेत. गुन्ह्याचे दृश्य अनेक वेळा पुन्हा तयार केले गेले आणि तज्ञांच्या मदतीने नमुने गोळा केले गेले. आरोपींच्या हालचाली दाखवणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजचेही विश्लेषण करण्यात आले आहे.


कोलकाता बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण



  • 10.10 वाजता डीडी एंट्री झाली आहे परंतु क्राईम सिन 11.30 वाजता सुरक्षित करण्यात आला, हे अस्वस्थ करणारे आहे 

  • अनैसर्गिक मृत्यूची नोंद 11.30 वाजता पोस्ट मार्टम झाल्यावर पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात आल्यावर करण्यात आली

  • प्रथमदर्शनी अस दिसते की ती नोंद जाणीवपूर्वक करण्यात आली

  • गुन्हा रात्री घडला आणि जवळपास 18 तासांनी क्राईम सिन सुरक्षित करण्यात आला

  • सीबीआयने याचा तपास करावा 


कोलकाता बलात्कार प्रकरणी सीबीआयचा सर्वोच्च न्यायालयात खुलासा 


सर्वोच्च न्यायालयात पश्चिम बंगाल सरकारचे वकील आणि सीबीआयचे वकील यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. यावेळी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आरोप सीबीआयने केला. तसेच अंत्यसंस्कार झाल्यानंतर FIR नोंद करण्यात आला, असेही सीबीआयने म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या