Nalasopara Kalamb News : नालासोपारा पूर्वेकडील कळंब गावाजळ माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या ठिकाणच्या जुन्या खाडी पुलाखाली अंदाजे एक महिन्याच्या बालिकेला अज्ञात व्यक्तींनी प्लास्टिकच्या पोत्यात घालून सोडून दिल्याचं उघड झालं. धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या बालिकेला अशा पद्धतीने कुणी सोडलं याचा शोध पोलिस घेत आहेत.
Nalasopara Baby Found : मुलीच्या रडण्याचा आवाज आला
गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जुन्या खाडी पुलाजवळ एका मुलीच्या रडण्याचा आवाज स्थानिक गावकऱ्यांच्या कानावर पडला. एका प्लॅस्टिकच्या पोत्यातून तो आवाज येत होता. त्या पोत्यामध्ये पाहिले असता त्यामध्ये एका महिन्याची मुलगी असल्याचं समोर आलं.
ग्रामस्थांनी तातडीने अर्नाळा सागरी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तात्काळ मुलीला ताब्यात घेत वसई-विरार शहर महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या त्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू
नालासोपारा पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, सदर बालिकेचे पालक किंवा तिला तिथे सोडणाऱ्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी यासंदर्भात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, समाजमाध्यमांवरही संताप व्यक्त केला जात आहे.
ही बातमी वाचा: