Sanjay Shirsat IT Notice | संजय शिरसाट यांना IT नोटीस, संपत्तीत तफावत; श्रीकांत शिंदेबाबत वक्तव्य मागे
Continues below advertisement
सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे शिवसेनेचे मोठे नेते संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांवेळी सादर केलेल्या शपथपत्रातील संपत्तीमध्ये मोठी तफावत आढळल्याने आयकर विभागाने यावर स्पष्टीकरण मागितले आहे. संजय शिरसाट यांनी नोटीसला उत्तर देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. एका कार्यक्रमात त्यांनी आयकर विभागाची नोटीस मिळाल्याचे सांगितले. २०१९ मध्ये त्यांची जंगम मालमत्ता १.२१ कोटी रुपये होती, जी २०२४ मध्ये १३.३७ कोटी रुपयांवर पोहोचली. स्थावर मालमत्ता २०१९ मध्ये १.२४ कोटी रुपये होती, ती २०२४ मध्ये १९.६५ कोटी रुपयांपर्यंत वाढली. ठेवी ५ लाखांवरून ८१ लाखांपर्यंत वाढल्या आहेत. वाहने ८५ लाखांवरून १८ लाखांवर आली आहेत, तर सोने १६ कोटींवरून १.४२ कोटींवर आले आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाने नोटीस पाठवल्याची माहिती संजय शिरसाट यांनी सुरुवातीला दिली होती, मात्र नंतर त्यांनी हे वक्तव्य मागे घेतले. श्रीकांत शिंदे यांना नोटीस आलेली नाही, चुकून त्यांचे नाव घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयकर विभाग सर्वांची छाननी करतो आणि अनेकांना नोटीस आल्या आहेत, असे शिरसाट म्हणाले. "इनकम टॅक्स विभाग हा त्याचे काम करत असताना आणि त्याचा सहकार्य करते हे आमची भूमिका असते," असे त्यांनी नमूद केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement