Can omicron detected by RTPCR test : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) नव्या व्हेरियंट (COVID-19 New Variant) ओमिक्रॉनने (omicron variant) जगभरातील देशांसह भारताचीही चिंता वाढवली आहे. सर्व देश त्यामुळे सतर्क झाले असून तयारी सुरु केली आहे. अशातच सध्या असलेल्या आरटीपीसीआर चाचणीत हा नवीन ओमिक्रॉन व्हेरियंट आढळतोय का? असा प्रश्न सर्वांना पडला असतानाच भारतातील मायलॅब (Mylab ) कंपनीने दावा केलाय की, त्यांच्या टेस्ट किटमधून 12 प्रकारच्या कोरोना व्हेरियंट ओळखता येऊ शकतो.


ओमिक्रॉन व्हेरियंटमधील म्यूटेशन किती धोकादायक आहे? यावर जागतिक आरोग्य संघटनांसह (WHO ) जगभरातील प्रत्येक देश संशोधन करत आहे.  तसेच सध्या असलेल्या लसी या व्हेरियंटविरोधात किती प्रभावी आहेत, याचाही शोध घेतला जात आहे. अशातच मायलॅबने त्यांच्या किट ओमिक्रॉन व्हेरियंटला ओळखू शकते, असा दावा केलाय. मायलॅब कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल म्हणाले की, मायलॅबची किट ओमिक्रॉन व्हेरियंटला ओळखू शकते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ओमिक्रॉन व्हेरियंटमधील म्यूटेशन स्पाइक प्रोटीन आणि जीन्समध्ये उपलब्ध असतात.  मायलॅबच्या टेस्टिंग किट कोरोना विषाणूला आरएनएमध्ये शोधण्यास पूर्णपणे सक्षण आहे. म्हणजेच आमची टेस्टिंग किट सर्व व्हेरियंटला ओळखू शकते, त्यात ओमिक्रॉनही असेल.


मायलॅबचा दाव्यानुसार 12 प्रकारच्या कोरोना व्हेरिएंटला डिडेक्ट करु शकतात. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार,  ओमिक्रॉन (Omicron ), बीटा (Beta ), जीटा (Zeta), एप्सिलॉन (Epsilon), डेल्टा (Delta), कप्‍पा (Kappa), गामा (Gamma), लॅम्ब्डा (Lambda), थीटा (Theta), अल्फा (Alpha), ईटा (Eta), लोटा (Lota) या व्हेरियंटला टेस्ट किटमधून ओळखता येऊ शकतं. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live



संबधित बातम्या : 


Coronavirus | मेड इन इंडिया : पुण्यातील मायलॅब कंपनीत बनणार कोरोना चाचणी किट्स
8 महिन्यांच्या गरोदर असताना घरबसल्या कोरोना चाचणीचं किट बनवलं, Mylab च्या मीनल दाखवे भोसले यांना सलाम
WEB EXCLUSIVE : Coviself Kit ची संकल्पना कशी सुचली? Mylabचे चेअरमन शैलेंद्र कवाडे 'माझा'वर
Corona Testing | पुण्यात मायलॅबसोबत कोरोना चाचण्यांसाठी आवश्यक RT PCR चाचण्यांच्या मशिनचं लाँचिंग
Mylab Kit Demo : घरच्या घरी कोरोनाची चाचणी कशी करायची? रॅपिड अँटिजेन टेस्टचा डेमो माझावर