Forbes India : फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2021 नुकतीच रिलीज  करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये  टॉप 100 श्रीमंत भारतीयांची यादी आहे. यातील पहिले 10  भारतीय कोण आहेत ते जाणून घेऊयात-

टॉप 10 श्रीमंत व्यक्तींची लिस्ट:1. मुकेश अंबानी ($92.7 बिलियन) - रिलायंस ग्रुप2. गौतम  अदानी($74.8 बिलियन) -  अदानी ग्रुप3. शिव नादर (31 बिलियन ) - एचसीएल टेक्नोलॉजीज4. राधाकिशन दमानी ($29.4 बिलियन)- डी-मार्ट5. सायरस पूनावाला ($19 बिलियन) - सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया6. लक्ष्मी मित्तल (18.8 बिलियन ) - आर्सेलर मित्तल7. सावित्री जिंदल ($18 बिलियन) - जिंदल ग्रुप8. उदय कोटक ($ 16.5 बिलियन) - कोटक ग्रुप9. पल्लोनजी मिस्त्री ($16.4 बिलियन) - शापूरजी पलोनजी ग्रुप10. कुमार मंगलम बिरला (15.8 बिलियन ) - आदित्य बिरला ग्रुप

फोर्ब्सच्या या लिस्टनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 2020 च्या तुलनेत 4 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तसेच अदानी यांची  संपत्ती 25.2 अब्ज डॉलरवरून 74.8 अब्ज डॉलरवर गेली. एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नादर यांच्या संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.6 बिलियनची वाढ झाली आहे.  ते या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतातील शंभर श्रीमंत लोकांची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत  775 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे आहे. फोर्ब्स कंपनीच्या रिपोर्टनुसार, कोरोना महामारीच्या दुसऱ्या वर्षात भारतातील श्रीमंतांनी त्यांच्या संपत्तीत जवळपास पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संबधित बातम्या : 

Lpg Gas Price Today: 100 रुपये महागला गॅस सिलेंडर, जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

Viral Video : नवरा-नवरीचा स्वॅग भारी; JCBच्या बकेटमध्ये बसून मांडवात एन्ट्री, पुढे जे घडलं ते धक्कादायक होतं

Exclusive : ...तर काँग्रेस 'एकला चलो रे'साठीही तयार, खासदार कुमार केतकरांचं मोठं वक्तव्य

Mamata Banerjee Mumbai Visit : भाजप विरोधात तिसरी आघाडी? आज ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची भेट