मोठी बातमी! शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी घुसले, भारतीय सैन्याने परिसराला घातला वेढा
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर सुरुच असून भारतावर झालेल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला आता युद्ध म्हणूनच पाहिले जाईल असे सांगण्यात आलेले असताना आता ही चकमक झाल्याचे समोर आले आहे.

Operation Sindoor: जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे. सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियनच्या जंगलात अनेक दहशतवादी वेढले गेले असल्याची माहिती आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले त्यानंतर भारत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांमधला तणाव वाढला होता. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर सुरुच असून भारतावर झालेल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला आता युद्ध म्हणूनच पाहिले जाईल असे सांगण्यात आलेले असताना आता ही चकमक झाल्याचे समोर आले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचे पोस्टरही लावले आहेत. त्यांच्यावर 20 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराने अनेक ठिकाणी शोध मोहीम सुरू केली आहे. आता शोपियानमध्ये दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेथे अनेक दहशतवादी उपस्थित आहेत, परंतु सध्या कोणत्याही दहशतवादी मारल्याचे वृत्त नाही.
जम्मू काश्मीरमध्ये चकमक
जम्मू आणि काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील शुक्रू केलर भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दलच्या विशिष्ट माहितीच्या आधारे, सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केलीय. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील शुक्रू केलर भागात दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर शोध मोहीमेदरम्यान सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांची चकमकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबार सुरू आहे.
हेही वाचा:
























